अज्ञात चोरट्यांनी फोडली सेंट्रल बँक
By Admin | Updated: May 31, 2014 23:56 IST2014-05-31T23:33:33+5:302014-05-31T23:56:16+5:30
सुलतानपूर येथील सेंट्रल बँक अज्ञात चोरट्यांनी फोडली; नागरिकांच्या सावधगीरीने हानी टळली.

अज्ञात चोरट्यांनी फोडली सेंट्रल बँक
सुलतानपूर : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सुलतानपूर अज्ञात चोरट्यांनी ३0 मे च्या रात्री दरम्यान फोडली. मात्र परिसरातील नागरिकांच्या सावधगीरीने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. अज्ञात तीन चोरट्यांनी बँकेचे मागील शटर तोडून आत प्रवेश करून बँकेतील कपाट फोडण्यास चोरट्यांनी सुरुवात केली. पण तोपर्यंत परिसरातील नागरिकांना चाहुल लागली. लगेच पोलीस व नागरिकांनी आपला मोर्चा बँकेकडे वळविला. नागरिक येत असल्याचे चोरट्यांच्या लक्षात येताच त्यांना पैसे असलेले कपाट फोडण्या आधीच घटनास्थळावरुन पोबारा करावा लागला. शाखा प्रबंधक मनोजकुमार किशोरीराम यांनी मेहकर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पोिलसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ४५७, ३८0, ५११ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.