ऑनलाइन वेबिनारद्वारे जागतिक वनदिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:36 IST2021-03-23T04:36:39+5:302021-03-23T04:36:39+5:30
वनविभाग मोताळा येथे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास जि. प. शाळा बोराखेडी येथील मुख्याध्यापक यांनी प्रास्ताविकपर शाळेत राबविलेले एक ...

ऑनलाइन वेबिनारद्वारे जागतिक वनदिवस साजरा
वनविभाग मोताळा येथे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास जि. प. शाळा बोराखेडी येथील मुख्याध्यापक यांनी प्रास्ताविकपर शाळेत राबविलेले एक मूल एक झाड, महिला दिनाला वृक्ष वाटप, वृक्ष रक्षाबंधन, जयंती उत्सवाला वृक्षारोपण, नर्सरी व वृक्ष दिंडीचे महत्त्व पटवून दिले. तसेच वनश्री पुरस्कार प्रदान रवींद्र गणेशे हे उपस्थित होते व त्यांनी वृक्षारोपण वृक्षसंवर्धन, वन्यजीव संरक्षण, हरित सेना, वटसावित्रीला वटवृक्षाचे महत्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. वनविभाग येथील आरएफओ यांनी सुद्धा वनसंरक्षणाचे महत्त्व सांगितले. या वेबिनारला वनविभाग कर्मचारी वनपाल डी. एम. पोटे, व्ही. डी. सानप, पी. आर. मोरे, वनरक्षक ए. एन. सपकाळ, पी. पी. मुंडे , ए. जी. बगळे, आर. बी. वाघ, एस. डी. राठोड, पूनम चव्हाण, उषा जाधव, डी. एम गायकवाड, एच. एच. पठाण, पी. एन. मिसाळकर, संतोष जाधव तसेच शिक्षकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. वनरक्षक शरद घुगे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.