हृदयविकाराने पोलीस कर्मचा-याचा मृत्यू

By Admin | Updated: October 13, 2016 02:04 IST2016-10-13T02:04:20+5:302016-10-13T02:04:20+5:30

धामणगाव बढे पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचा-याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

Cardiac death of cardiac employee by heart attack | हृदयविकाराने पोलीस कर्मचा-याचा मृत्यू

हृदयविकाराने पोलीस कर्मचा-याचा मृत्यू

धामणगावबढे (जि. बुलडाणा), दि. १२- कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने धामणगाव बढे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले एएसआय चंद्रशेखर बावस्कर यांचा मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे मलकापूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान ही घटना घडली.
चंद्रशेखर दौलतराव बावस्कर (वय ५२) रा. वृंदावन नगर मलकापूर (मूळ गाव लोणवाडी, ता.मलकापूर) हे एएसआय म्हणून धामणगाव बढे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. १0 ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत त्यांनी ठाणे अंमलदार म्हणून पोलीस ठाण्यात डयूटी बजावली.
त्यानंतर दुर्गा देवीच्या बंदोबस्तासाठी सहकार्‍यांसह पेट्रोलिंग करीत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ ठाणेदार वळवीसह सहकारी कर्मचार्‍यांनी त्यांना मलकापूर येथील रुग्णालयात दाखल केले.
मंगळवारी पहाटे ३:३0 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी मलकापूर येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.

Web Title: Cardiac death of cardiac employee by heart attack