कार उलटून एक जण ठार

By Admin | Updated: March 21, 2016 01:54 IST2016-03-21T01:54:38+5:302016-03-21T01:54:38+5:30

होशंगाबादजवळ अपघात, तीन जखमी

A car was killed and one killed | कार उलटून एक जण ठार

कार उलटून एक जण ठार

नांदुरा: मध्य प्रदेशातील बरेली येथून नांदुर्‍याकडे येत असताना शहरातील मुंधडा कुटुंबीयांच्या कारला होशंगाबादजवळ अपघात झाला. त्यामध्ये नांदुरा खुर्द येथील वासुदेव वामनराव नारखेडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर कारमधील अन्य तिघे गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना १९ मार्च रोजी सकाळी घडली. नांदुरा येथील माजी नगराध्यक्ष जानकीदास मुंधडा यांच्या कुटुंबातील श्रीलाल भानुदास मुंधडा हे आपल्या एम.एच.२८/८३५१ क्रमांकाच्या कारने चालक वासुदेव वामनराव नारखेडे, मीग मधुकर गोंड व अकोला येथील जावई रमेशचंद्र कोठारी यांच्यासह बरेली (मध्यप्रदेश) येथे गेले होते. तेथून ते १९ मार्च रोजी सकाळी नांदुरा येथे येण्यासाठी निघाले. यावेळी श्रीलाल मुंधडा हे कार चालवित होते. दरम्यान, होशंगाबादजवळील एका वळणावर मुंधडा यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती उलटली आणि चालकाच्या शेजारी बसलेले वासुदेव नारखेडे हे कारखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील श्रीलाल मुंधडा, त्यांचे जावई रमेशचंद्र कोठारी व मधुकर गोडे हे जखमी झाले. कोठारी यांना जास्त मार लागल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. मृतक वासुदेव नारखेडे हे गेल्या ४0 वर्षांंपासून मुंधडा यांच्याकडे कारवर चालक होते. प्रामाणिक आणि विश्‍वासू व्यक्ती अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच नांदुर्‍यात हळहळ व्यक्त करण्यात आली.

Web Title: A car was killed and one killed