समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, महिला ठार
By संदीप वानखेडे | Updated: May 14, 2023 18:58 IST2023-05-14T18:56:26+5:302023-05-14T18:58:07+5:30
ही घटना समृद्धी महामार्गावर नांदगाव खंडेश्वर पाेलिस स्टेशनच्या हद्दीत घडली.

समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली, महिला ठार
संदीप वानखडे/ बुलढाणा
मेहकर : पुलाच्या कठड्याला धडक दिल्यानंतर कार उलटली. यामध्ये मेहकर येथील महिला जागीच ठार झाली, तर चार जण जखमी झाले. ही घटना समृद्धी महामार्गावर नांदगाव खंडेश्वर पाेलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. संध्या आनंद खंडेलवाल (वय ४५, रा.रामनगर, मेहकर) असे मृतक महिलेचे नाव आहे.
मेहकर शहरातील रामनगरात राहणारे खंडेलवाल कुटुंब कार क्र. एमएच २७ बीक्यू ४५८५ ने पुलगाव येथे जात हाेते. दरम्यान, दुपारी समृद्धी महामार्गावर कारंजापासून २५ किमी अंतरावर, तसेच नांदगाव खडेश्वर पाेलिसांच्या हद्दीत चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पुलाच्या कठड्यावर धडकली. त्यानंतर, कार उलटल्याने संध्या खंडेलवाल यांचा जागीच मृत्यू झाला, तर आनंद खंडेलवाल, पवन शर्मा, गोपाल शर्मा, कमलेश शर्मा हे किरकोळ जखमी झाले. संध्या खंडेलवाल यांच्यापश्चात सासू, पती, तीन मुले, दीर, जाऊ व परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मेहकर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.