समृद्धी महामार्गावर कार उलटली, दाेन जण जखमी
By संदीप वानखेडे | Updated: August 13, 2023 20:46 IST2023-08-13T20:46:26+5:302023-08-13T20:46:37+5:30
दुसरबीड : समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटल्याने दाेन जण जखमी झाले़ ही घटना १३ ऑगस्ट राेजी दुसरबीडजवळ सायंकाळी घडली़ ...

समृद्धी महामार्गावर कार उलटली, दाेन जण जखमी
दुसरबीड : समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटल्याने दाेन जण जखमी झाले़ ही घटना १३ ऑगस्ट राेजी दुसरबीडजवळ सायंकाळी घडली़ जखमीपैकी एक जण गंभीर जखमी आहे.
दुसरबीड येथून गेलेल्या समृद्धी महामार्ग चॅनल नंबर ३०६.३ मुबंई कॉरिडॉरवरुन कार क्रमांक जिजे ०३ एलजी ८४१९ ने पार्थ हरपाल रा़ राजकोट व प्रवीण मधुकर खडसे वय १९ वर्षे रा. वाशिम हे वाशिम कडून औरंगाबाद कडे जात हाेते़ दरम्यान, दुसरबीडजवळ चालकाला डुलकी लागल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले़ त्यामुळे, वाहन समृद्धी महामार्गावर उलटल्याने दाेघेही जखमी झाले़ या अपघाता चालक पार्थ हरपाल गंभीर जखमी झाले आहेत़.
त्यांना तातडीने मेहकर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले़ तसेच अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजुला करून वाहतुक सुरळीत करण्यात आली़ यावेळी महामार्ग पोलीस निरीक्षक शैलेश पवार, विष्णू गोलांडे, पोकॉ संदीप किरके,डॉ.वैभव बोरडे, ॲम्बुलन्स चालक शिंदे, सुरक्षा रक्षक अमोल जाधव, श्रावण घटे, भागवत भुसारी, जाधव, गाडी चालक गणेश चाटे, क्युआरव्ही पथक यांनी अपघात ग्रस्तांना मदत केली़