कारची दुचाकीला धडक ; युवक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 17:36 IST2020-05-11T17:36:23+5:302020-05-11T17:36:46+5:30
दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी चिखली- खामगाव मार्गावरील टाकरखेड मुसलमान फाट्याजवळ घडली.

कारची दुचाकीला धडक ; युवक जागीच ठार
अमडापूर/धामणगाव धाड : कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी चिखली- खामगाव मार्गावरील टाकरखेड मुसलमान फाट्याजवळ घडली. बुलडाणा तालुक्यातील धामणगाव धाड येथील योगेश रंगनाथ भवर (२७) हा युवक बंधन बॅँकेत काम करीत होता. सोमवारी सकाळी एम-एच-२८- डब्ल्यू -९६३६ क्रमांकाच्या दुचाकीने कामानिमित्त तो चिखलीवरुन अमडापूरकडे जात होता. सकाळी ८ वाजताच्या सुमारास समोरुन येणाºया एम-एच-१२-एच-एम-४११० कम्राकांच्या कारने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये युवकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अमडापूरचे ठाणेदार अमित वानखडे यांनी एएसआय लक्ष्मण टेकाळे, गिते, वैद्य यांना घटनास्थळी पाचारण केले. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमडापूर पोलिस करीत आहेत.