कारच्या दुचाकीला धडक; एक ठार, एक गंभीर

By Admin | Updated: April 27, 2017 00:13 IST2017-04-27T00:13:28+5:302017-04-27T00:13:28+5:30

खामगाव : दुचाकीस्वारांना पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला.

Car bikes; One killed, one serious | कारच्या दुचाकीला धडक; एक ठार, एक गंभीर

कारच्या दुचाकीला धडक; एक ठार, एक गंभीर

खामगाव : दुचाकीस्वारांना पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला.
ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर खामगाव ते नांदुरा दरम्यान आमसरी फाट्यानजीक २६ एप्रिल रोजी दुपारी घडली. नांदुरा तालुक्यातील वडाळी येथील रमेश तुकाराम सरदार (वय ४५) व हरिदास सीताराम इंगळे रा.पिंपळगाव राजा हे दोघे २६ एप्रिल रोजी दुपारी दुचाकी क्रमांक एम.एच.२८ एपी ६४४९ ने नांदुराकडे जात होते.
दरम्यान, उपरोक्त ठिकाणी पाठीमागून येणाऱ्या भरधाव कार क्रमांक एम.एच.२७ एसी ७२२३ च्या चालकाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात रमेश सरदार हे जागीच ठार झाले तर हरिदास इंगळे गंभीर जखमी झाला. घटनेनंतर हरिदास इंगळे यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. याप्रकरणी जलंब पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Car bikes; One killed, one serious