उमेदवारी व मतदारसंघासाठी संघर्ष
By Admin | Updated: September 19, 2014 00:29 IST2014-09-19T00:29:37+5:302014-09-19T00:29:37+5:30
मेहकर मतदारसंघात इच्छुकांच्या रस्सीखेच; कार्यकर्त्यांची ओढताण.

उमेदवारी व मतदारसंघासाठी संघर्ष
मेहकर : विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, मेहकर मतदारसंघात इच्छुकांचा उमेदवारी मिळविण्यासाठी संघर्ष सुरू आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्याने राष्ट्रवादीकडे या मतदार संघातील अनेक इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. तसेच शिवसेना, रिपाइं, मनसे, भारिप बमसं या पक्षातूनही इच्छुकांची उमेदवारीसाठी रस्सीखेच निर्माण झाली असून, यामध्ये काँग्रेसचा हा मतदारसंघ ताब्यात घेण्याचाही संघर्ष सुरू झाला आहे. या सर्व प्रकारामध्ये कार्यकर्त्यांची मात्र ओढताण होत आहे.
मेहकर विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सर्वच पक्षातील इच्छुकांनी उमेदवारीसाठी ह्यफिल्डिंगह्ण लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाइं, मनसे, भारिप बमसं या पक्षातूनही अनेक इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामध्ये सर्वाधिक इच्छुक उमेदवार हे राष्ट्रवादीकडे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले असून, मेहकर मतदार संघातील अनेक इच्छुकांचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडून अँड. साहेबराव सरदार, विठ्ठलराव ढाकरके, मंदाकिनी कंकाळ, अश्विनी आखाडे, मेहकर न.प.चे माजी नगराध्यक्ष अशोक अडेलकर, बाबुराव मोरे, डॉ. वसंत बोरकर, प्रभाकर सपकाळ, श्रीमती सुनीता घुले, राजेश्वर वानखेडे हे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.