शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

पन्नाशीतील उमेदवारांच्या हाती बुलडाण्याचे राजकारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 2:03 PM

बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल केलेल्या प्रमुख पाच जणांचे वय ५३ वर्षांच्या आत असल्याची माहिती त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रातून मिळाली.

 सोहम घाडगे लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राजकारणात वयाची पन्नाशी तरुणपणाचे लक्षण मानल्या जाते. बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल केलेल्या प्रमुख पाच जणांचे वय ५३ वर्षांच्या आत असल्याची माहिती त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रातून मिळाली. त्यामुळे निवडून कुणीही आले तरी पन्नाशीतील उमेदवाराच्याच हाती बुलडाण्याचे राजकारण येणार असल्याचे दिसून येते.क्षेत्र कुठलेही असो वयाची अट ठरलेली असते. राजकारणात मात्र वयाचे बंधन नाही. उलट वाढलेले वय राजकीय परिपक्वतेचे लक्षण मानल्या जाते. राज्य आणि केंद्रातील नेत्यांच्या वयाकडे नजर टाकल्यास अनेकांनी सत्तरी, ऐंशी पार केल्याचे दिसते. मात्र असे असले तरी राजकारणात तरुणांना संधी मिळाली पाहिजे. राजकारणात पन्नाशी पार केलेल्या नेत्यांनाही तरुणच समजले जाते. शिवाय राजकारणातील व्यक्ती शारीरिक तंदुरुस्तीकडे अधिक लक्ष देतात. त्यामुळे तसेही त्यांचे वय तरुणच दिसते. ८० ते ९० वर्ष वयाचे अनेक नेते, पुढारीही राजकारणात सक्रिय आहेत.शारीरिक तंदुरुस्ती ठेवत अजूनही कामाचा व्याप सांभाळतात. डोक्यावरचे 'केस' गेले अन अंगावर 'केसेस' वाढल्या म्हणजे राजकारणी असेही राजकारणाबद्दल उपहासाने म्हटले जाते. वय वाढले म्हणजे परिपक्वता येते ही गोष्ट खरी असली, तरी राजकारणात तरुणांना संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे अनेक पक्ष तरुणांना संधी देण्याची भूमिका घेतात.वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या उमेदवारांना कुठलीच उमेदवारी देण्यात येणार नसल्याचे भाजपने अलीकडेच जाहीर केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, मार्क्सवादी कम्यूनिस्ट पार्टी, बहुजन समाज पार्टी, समाजवादीत पार्टीत तरुणांसह ज्येष्ठ नेते काम करतात.

असे आहे उमेदवारांचे वय विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची ४ आॅक्टोबर शेवटची तारीख होती. बुलडाणा मतदारसंघात सात उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी प्रमुख पाच उमेदवारांचे वय ५३ वर्षांच्या आत आहे. आ. हर्षवर्धन सपकाळ ५१, संजय गायकवाड ५३, योगेंद्र गोडे ५१, विजयराज शिंदे ५२ व मोहम्मद सज्जाद अब्दूल खालिक यांचे वय ५० वर्ष आहे. बुलडाण्यातून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये इतर गोष्टी भिन्न असल्या तरी वयात मात्र बरेच साम्य असल्याचे दिसून येते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019