शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरच नव्हे तर कोणत्याही आजारात सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक -  डॉ. अविनाश सावजी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 13:33 IST

‘कॅन्सर’ हा आजार झाला म्हणजे सर्वकाही संपले! असा अर्थ कुणीही लावू नये, असा मौलिक सल्ला अमरावती येथील ‘प्रयास’संस्थेचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी यांनी दिला.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : ‘कॅन्सर’ या आजाराला जगातील महाभयंकर आजारात गणले जाते. पंरतु, कॅन्सरच नव्हे तर कोणत्याही आजाराला सकारात्मक दृष्टीकोन आणि भावनेने सामोरे गेल्यास, आजार बरा होण्यास बळ मिळते. शरीराच्या कॅन्सरपेक्षा मनाचा कॅन्सर सर्वात घातक असून, तो दूर झाला पाहिजे. ‘कॅन्सर’ हा आजार झाला म्हणजे सर्वकाही संपले! असा अर्थ कुणीही लावू नये, असा मौलिक सल्ला अमरावती येथील ‘प्रयास’संस्थेचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी यांनी दिला. ‘कॅन्सर’ प्रबोधन यात्रेसाठी ते खामगावात आले असता त्यांनी ‘लोकमत’शी मनमोकळा संवाद साधला. 

‘कॅन्सर’या गंभीर आजाराच्या क्षेत्रातील समाजकार्याला सुरूवात कशी झाली?-  ‘जीवन शैली आणि आरोग्य’ हा विषय आपल्या आवडीचा राहीला आहे. हार्ट अ‍ॅटक, ब्लडप्रेशर आणि इतर आजारामध्ये आहार, विहार कसा असावा? याबाबत मार्गदर्शन करतानाच आचार-विचाराबाबतही समुपदेशन करायला सुरूवात केली. गेल्या ३५ वर्षांच्या सेवाकार्यात लोक जुळत गेले. त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून ‘कॅन्सर’या भंयकर आजाराच्या क्षेत्रात सामाजिक कार्य सुरू केले आहे. 

 ‘कॅन्सर’ग्रस्ताला आधार देण्यासाठी आपले प्राधान्य कशाला?- कॅन्सर या आजाराच्या रुग्णाला  सर्जरी, केमो आणि रेडिओ थेरपी या तीन प्रमुख तांत्रिक बाबीसह मानसिक आणि सामाजिक आधाराची गरज भासते. यामध्ये तांत्रिक बाबी वगळता मानसिक आधार आणि जीवन शैली आणि आरोग्यबाबत सकारात्मक समुपदेशन आणि   सकारात्मक दृष्टीकोन देण्यासाठी आपले प्राधान्य आहे.

‘कॅन्सर’ या आजारा विरोधात लढा देण्यासाठी उपाययोजनांबाबत काय सांगाल?- ‘कॅन्सर’सारख्या गंभीर आजारा विरोधात लढण्यासाठी राज्यस्तरीय नेटवर्क तयार करण्याचे आपले प्रयत्न आहेत. यासाठी अमरावती येथे गेल्यावर्षी राज्यातील २० जिल्ह्यातील कॅन्सर ग्रस्तांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावर्षी अहमद नगर ते  अमरावती ‘कॅन्सर’प्रबोधन यात्रा काढण्यात आली. तसेच पुणे येथे देखील याचवर्षी कॅन्सर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबिराला राज्यातील सर्वच जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यस्तरीय नेटवर्कच्या माध्यमातून कॅन्सर रूग्णांसमोर पुस्तक आणि उदाहणांसह सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे आपले प्रामाणिक प्रयत्न आहेत.

  कॅन्सर आणि इतर आजारांमध्ये शासकीय उपाययोजनाबाबत अपेक्षा काय?- कॅन्सरवर मात करण्यासाठी शासनाने कॅन्सर आजारातून बरे झालेल्यांना रुग्ण समुपदेशनाचे काम द्यावे. म्हणजे, त्यांच्या अनुभवाचा फायदा समाजातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना हमखास होईल. कॅन्सर सोबतच इतर गंभीर आजारांमध्येही याच पध्दतीचा शासन स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. विविध आजार आणि नैराश्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी ‘आहार-विहार, आचार आणि विचार’ या चतुसुत्रींकडे शासन स्तरावरून प्रयत्न केले जाणे आवश्यक असल्याचेही डॉ. अविनाश सावजी म्हणाले.

टॅग्स :khamgaonखामगावcancerकर्करोगinterviewमुलाखत