शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य स्थायी समित्यांची निवड रद्द करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क देऊळगावराजा : स्थानिक नगरपालिकेच्या सभागृहात स्थायी समितीच्या निवडणुकीदरम्यान बहुमत असलेल्या गटनेत्याला मान्यता न देता पूर्वीच्या गटनेत्याला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

देऊळगावराजा : स्थानिक नगरपालिकेच्या सभागृहात स्थायी समितीच्या निवडणुकीदरम्यान बहुमत असलेल्या गटनेत्याला मान्यता न देता पूर्वीच्या गटनेत्याला ग्राह्य धरून नियमबाह्य पद्धतीने झालेली निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी भाजपच्या गटनेत्या शारदा जायभाये यांनी पत्रपरिषदेतून केली.

नगराध्यक्ष सुनीता शिंदे यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. रामदास शिंदे, तालुकाध्यक्ष विठोबा मुंढे, शहराध्यक्ष प्रवीण धन्नावत, भाजप गटनेते शारदा जायभाये, नगरसेविका पल्लवी वाजपे, मल्हार वाजपे, मालनबी, सुधाकर जायभाये, सलीम खान, निशिकांत भावसार, शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे आदींची उपस्थिती होती. गुरुवारी नगरपालिकेच्या सभागृहात भाजपच्या नगरसेवकांनी बहुमताने शारदा जायभाये यांना गटनेतापदी निवडले होते. तत्पूर्वी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना १९ जानेवारी रोजी एका पत्राद्वारे नवीन गटनेता निवडीसंदर्भात पत्र देऊन अवगत केले होते, तसेच जिल्हाधिकारी बुलडाणा यांनाही एका पत्राद्वारे अवगत करण्यात आले होते, अशी माहिती पत्रकार परिषदेत शारदा जायभाये यांनी दिली. दरम्यान, पालिका मुख्याधिकाऱ्यांनी भाजपच्या पूर्वीच्या गटनेत्या विमल माळोदे व नव्याने निवडण्यात आलेल्या भाजपच्या गटनेत्या जायभाये यांच्यात गटनेता म्हणून कुणाला मान्यता द्यायची आहे, याबाबत मार्गदर्शन मागितले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत कुठलेही पत्र पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले नाही, स्थायी समितीच्या निवडणुकीदरम्यान पीठासीन अधिकारी यांच्यासमोर जायभाये यांनी गटनेता पदावर दावा करीत बहुमत असलेले पत्र दिले. मात्र, त्यांना गटनेता म्हणून सभागृहात मान्यता दिली नाही, असा आरोप करीत शारदा जायभाये यांनी गुरुवारी निवड झालेल्या नवनिर्वाचित सभापतीपदे रद्द करून नियमबाह्य पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. यावेळी भाजपच्या गटनेत्यांनी बुलडाणा नगरपरिषदेत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ऐन वेळेवर एकच गटनेता निवडला व येथील पीठासीन अधिकारीऱ्यांनी त्यांना मान्यता दिल्याचे पत्रपरिषदेत स्पष्ट केले.