शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

‘सीएए’ देशहिताचा; काही पुढाऱ्यांनी देशाला गैरसमजाच्या विद्यापीठात उभं केलंयः डॉ. उदय निरगुडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 18:25 IST

ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते उदय निरगुडकर यांच्याशी खामगाव येथे साधलेला संवाद...

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : महासत्ता ही त्याग, दूरदृष्टी आणि कठोर पावलांनीच बनते. राष्ट्रचेतना टिकविण्यासाठी ‘सीएए’  भारतीय नागरिकत्व कायद्याची आवश्यकता आहे. हा कायदा कुणाच्याही विरोधात नाही. त्यामुळे या विरोधात कुणीही आगडोंब उठविण्याचे काहीही एक कारण नसावे. कारण लोकशाही मार्गाने विरोध करण्याचा अधिकार सर्व समान आहे. ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते उदय निरगुडकर यांच्याशी खामगाव येथे साधलेला संवाद...

 ‘सीएए’ भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध योग्य आहे का?संसदेने बहुमताने पारीत केलेल्या कायद्याला विरोध करणे अजिबात चुकीचं आहे. कायद्याला विरोध करून कोणत्या लोकशाही मुल्यांची जपणूक केली जात आहे? विरोध करताना केल्या जाणाऱ्या निदर्शनात हातात तिरंगा राष्ट्रध्वज घेत, त्याच देशाच्या संसदेने पारीत केलेला कायद्याला विरोध केला जात आहे. या कायद्याला विरोध करून काही राजकीय पुढाऱ्यांनी  संपूर्ण देशाला गैरसमजाच्या विद्यापीठात उभं केलं आहे.

‘सीएए’ लागू करण्यास काही राज्यांचा विरोध आहे?‘सीएए’लागू करण्यास काही राज्यांचा होणारा विरोध साफ चूक आहे.राज्ये केंद्राच्या विषयाला विरोध करूच शकत नाही. कारण नागरिकत्व हा केंद्राचा अधिकार आहे. राज्याचा नाही. मात्र, राजकारण म्हणून या कायद्याला विरोध केल्या जात आहे. देशात अस्थिर वातावरण निर्माण केलं जातेय. ही दुर्दैवी बाब आहे.  या कायद्यामुळे देशातील मुस्लिमांना कोणताही धोका नाही. याउलट निर्वासीत म्हणून जगत असलेल्यांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आहे.

 जेएनयू विद्यापीठाबद्दल आपले मत काय?जेएनयू विद्यापीठात एकीकडे अराजकता माजविणारे विद्यार्थी तयार होतात. तर दुसरीकडे जागतिक स्तरावर चमकणारे विद्यार्थी तयार होतात. अशा विद्यापीठांना प्रत्युत्तर देण्यासाठी दर्जेदार विद्यापीठ उभे करणे काळाची गरज आहे.

देश भारतीय नागरीकत्व दुरूस्ती कायदा (सीएए)वर अशांत होण्याची बीजं फाळणीमध्ये पेरली गेली आहेत. मात्र, हजारोवर्षांचा इतिहास असलेला हा देश विविध आक्रमणानंतरही शाबूत राहीला. त्यामुळे हा देश फार काळ अशांत राहू शकणार नाही. सर्व विचार या विशाल भारतीय विचारधारेने स्वीकारले आहेत.

‘सीएए’कायद्यात कोणाचेही अधिकार हिरावून घेण्याची तरतूद आहे का ?अजिबात नाही, केंद्र शासनाने लागू केलेला भारतीय नागरिकत्व दुरूस्ती कायदा सन १९५५ च्या कायद्यातील संशोधन आहे. या संशोधनातून भारतीय नागरिकता अधिनियम १९५५ कलम २,६,७ आणि १८, पारपत्र अधिनियम १९२० कलम ३ आणि विदेशी नागरिक कायदा १९४६ या जुन्या कायद्यातील कोणतीही कलम रद्द करण्यात आलेली नाही. तर केवळ नवीन कलम जोडण्यात आले आहे. भारतातील कोणत्याही नागरिकाचा यामुळे अधिकार हिरावल्या जाणार नाही. तर संरक्षण देण्यासाठीच हा सुधारीत ‘सीएए’कायदा उपयुक्त ठरणार आहे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाcongressकाँग्रेसjnu - jawaharlal nehru universityजेएनयू