१५ दिवसांपूर्वी विवाह झालेल्या व्यापाऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

By विवेक चांदुरकर | Updated: May 22, 2024 12:27 IST2024-05-22T12:26:10+5:302024-05-22T12:27:20+5:30

वरवट बकाल येथील घटना

businessman who got married 15 days ago died of snakebite | १५ दिवसांपूर्वी विवाह झालेल्या व्यापाऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

१५ दिवसांपूर्वी विवाह झालेल्या व्यापाऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

विवेक चांदूरकर, खामगाव जि. बुलढाणा, लोकमत न्यूज नेटवर्क, वरवट बकाल : येथील रंगाचा व्यवसाय करणारे व्यापारी संदीप शेषराव तेटु (वय ३१ वर्ष) हे नेहमी प्रमाणे वरवट बकाल बस थांब्यावरील रंगांच्या दुकानात २२ मे रोजी सकाळी गेले असता त्यांना सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

संदीप तेटू यांना प्रथम खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढिल उपचारासाठी शेगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. संदीप यांच्या लग्नाला दोन आठवडेच झाले आहे. त्यांचा संसाराचा गाडा सुरू ही झाला असताना त्यांचा मृत्यू झाल्यामुळे वरवट बकालसह सूनगावमध्ये शोककळा पसरली आहे. सायंकाळी सुनगांव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पच्यात पत्नी, एक भाऊ, एक बहीण आई वडील असा आप्त परिवार आहे.

Web Title: businessman who got married 15 days ago died of snakebite