नवरात्र उत्सवात मेहकर आगाराने केल्या बसेस बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:00 IST2017-09-27T23:49:31+5:302017-09-28T00:00:27+5:30

सिंदखेडराजा : मेहकर आगाराने साखरखेर्डा रोडवरील अनेक एसटी बसच्या फेर्‍या नवरात्र उत्सवात बंद केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी बस आगाराचा हा नियोजनशून्य कारभार सुरु असून, बंद बसेस तत्काळ सुरु कराव्यात, अशी मागणी प्रवाशी संघटनेने केली आहे.साखरखेर्डा हे गाव आडवळणी असल्याने या गावावरुन एकही बस लांब पल्ल्याची नाही. २0 हजार लोकसंख्या असलेल्या गावात दोन मोठे धार्मिक स्थळे आहेत. तसेच साखरखेर्डा ते सिंदखेडराजाचे अंतर ५0 किमी आहे.

Buses shut by buses for the Navaratri festival! | नवरात्र उत्सवात मेहकर आगाराने केल्या बसेस बंद!

नवरात्र उत्सवात मेहकर आगाराने केल्या बसेस बंद!

ठळक मुद्देप्रवासी झाले त्रस्त एसटी बस आगाराचा नियोजनशून्य कारभार 

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : मेहकर आगाराने साखरखेर्डा रोडवरील अनेक एसटी बसच्या फेर्‍या नवरात्र उत्सवात बंद केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी बस आगाराचा हा नियोजनशून्य कारभार सुरु असून, बंद बसेस तत्काळ सुरु कराव्यात, अशी मागणी प्रवाशी संघटनेने केली आहे.साखरखेर्डा हे गाव आडवळणी असल्याने या गावावरुन एकही बस लांब पल्ल्याची नाही. २0 हजार लोकसंख्या असलेल्या गावात दोन मोठे धार्मिक स्थळे आहेत. तसेच साखरखेर्डा ते सिंदखेडराजाचे अंतर ५0 किमी आहे. तालुक्यातील ३0 ग्राम पंचायतीच्या निवडणूका असून प्रत्येक कामासाठी उमेदवाराला सिंदखेडराजा येथे जावे लागते. त्याचबरोबर निवडणूक संबंधी कामासाठी ग्रामसेवक, शिक्षक, पटवारी यांना बैठकीसाठी जावे लागते. तालुक्याच्या ठिकाणी जाणार्‍या बसेस मेहकर आगाराने गेल्या एक महिन्यापासून बंद केल्याने प्रवाशी, कर्मचारी यांचे हाल होत असून, त्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. याबाबत अनेकवेळा तक्रार करुनही मेहकर आगारातील काही अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे बसेस बंद करुन त्या इतरत्र वळविण्याचा प्रकार सुरु आहे. दुपारी १२.३0 वाजता मेहकर येथून सुटणारी मेहकर ते जालना ही बस एकतर बंद ठेवतात, नाहीतर वाहकाला मशिन मिळत नाही त्यामुळे कर्मचारी असूनही हा प्रकार घडविल्या जातो. साखरखेर्डा येथून सकाळी ६ वाजता जालन्याकरीता बस सुरु होती. त्या बसला कारण नसताना लव्हाळा फाट्यावर मुक्कामी पाठविल्या जाते. साखरखेर्डा ते जालना ही सकाळी ६ वाजता जाणारी बस एक महिन्यापासून बंद आहे. 

बसेस कमी असल्याने त्या बंद केल्या आहेत. लवकरच सुरु करण्याचा आमचा प्रयत्न  राहील.
- चंद्रकांत पाथरकर
आगार व्यवस्थापक,मेहकर.

Web Title: Buses shut by buses for the Navaratri festival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.