खामगावात पुतळा जाळून निषेध; सर्वधर्मिय रॅलीने बंदचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:23 PM2019-02-16T12:23:32+5:302019-02-16T12:24:20+5:30

खामगाव :  पुलनामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी खामगावात तीव्र पडसाद उमटले.

Burnt statue in Khamgaon; Closing Appeal | खामगावात पुतळा जाळून निषेध; सर्वधर्मिय रॅलीने बंदचे आवाहन

खामगावात पुतळा जाळून निषेध; सर्वधर्मिय रॅलीने बंदचे आवाहन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :  पुलनामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी खामगावात तीव्र पडसाद उमटले. स्थानिक बस स्थानक चौकात दुपारी १२ वाजता दहशतवादास प्रोत्साहन देणाºया पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. तसेच तीव्र नारेबाजीही यावेळी करण्यात आली. पुलनामा येथील दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या भारतीय सैनिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी सर्व धर्मिय बांधवांच्यावतीने सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावरून एक रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे शहर बंदचे आवाहन करण्यात आले. दरम्यान, सकाळी १० वाजता बस स्थानक चौकात टायर जाळून तर  दुपारी १२ वाजताच्या दरम्यान, दहशतवादास प्रोत्साहन देणाºया पाकीस्तानच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी अनेक व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवून शहीदांना श्रध्दांजली अर्पण केली. काळीपिवळी असोसिएशनसह विविध सामाजिक संघटनाही या बंदमध्ये मोठ्यासंख्येने सहभागी झाल्या. बस स्थानक चौकात काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, माजी आमदार नाना कोकरे यांच्या उपस्थितीत सर्वधर्मिय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुतळ्याचे दहन केले.

 
 

Web Title: Burnt statue in Khamgaon; Closing Appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.