विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे केले कमी; राजश्री शाळेने राबविला अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 18:02 IST2018-08-01T18:01:33+5:302018-08-01T18:02:31+5:30

राजश्री प्राथमिक शाळेने अनोखा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी केले आहे.

The burden of the school bags reduced | विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे केले कमी; राजश्री शाळेने राबविला अनोखा उपक्रम

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे केले कमी; राजश्री शाळेने राबविला अनोखा उपक्रम

ठळक मुद्देराजश्री प्राथमिक शाळेमध्ये १ आॅगस्ट रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जुन्या पुस्तकातून तासिका, असे नियोजन करून विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी केले आहे.

 

मेहकर : सध्या सर्वच शाळेत जाणाºया प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या वजनापेक्षाही दुप्पट स्कुल बॅग उचलाव्या लागतात. त्यामुळे सर्व पालक विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या वाढत्या ओझ्यामुळे त्रस्त आहेत. यासाठी राजश्री प्राथमिक शाळेने अनोखा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी केले आहे. याबाबत राजश्री प्राथमिक शाळेमध्ये १ आॅगस्ट रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना वेगवेगळ्या आजारांना समोरे जाण्याचे चित्र आपल्याला दिसते, मुलांमध्ये पाठीचे, मनक्याचे आजार उद्भवतात. अशातच जुन्या पुस्तकांचासाठा योग्यरित्या जपून, बायडींग करून स्थानिक राजश्री प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी अनोखा उपक्रम साधत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझेच कमी केले आहे. सदर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून मागील वर्षीचे चांगल्या स्थितीचे पुस्तके आणि जे फाटके होते, ते व्यवस्थीत बायडींग करून विना पुस्तकाचे दप्तर हा उपक्रम सुरू केला आहे. चालु शैक्षणिक वर्षात जे नविन पुस्तके विद्यार्थ्यांना मिळाले, ते त्यांनी घरीच ठेवून शाळेत जुन्या पुस्तकातून तासिका, असे नियोजन करून विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी केले आहे. विद्यार्थ्यांनी दप्तरात फक्त नोटबुकच शाळेत आणावे, असे सांगण्यात आले. त्यामुळे राजश्री प्राथमिक शाळा ही दप्तराचे आझे कमी करणारी मेहकर शहरातील प्रथम शाळा ठरली आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष खा.प्रतापराव जाधव आणि सचिव ऋषि जाधव यांनी सर्व शिक्षकवृंदाचे कौतुक केले आहे. यावेळी श्रीमती सिंधुताई जाधव महिला माहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बालाजी लाहोरकर ,शिक्षक दिलीप देबाजे, मुख्याध्यापक अजिक्य बार्डेकर, शिक्षक विजय फंगाळ, रामेश्वर इंगळे, शिक्षीका कु.सोनल देशमुख, कु.मनिषा वानखेडे, शशीकला बाजड आणि शिक्षक शिप्रसाद शेळके, विकास भोसले, गणेश नवले, गणेश निकम उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The burden of the school bags reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.