सीमावर्ती जिल्ह्यातील १२५ रुग्णांना बुलडाण्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:33 IST2021-04-25T04:33:56+5:302021-04-25T04:33:56+5:30

प्रामुख्याने बुलडाणा आणि खामगाव या दोन ठिकाणी या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. बुलडाणा जिल्ह्याची सीमा ही मध्य प्रदेश, ...

Bullying of 125 patients in border districts | सीमावर्ती जिल्ह्यातील १२५ रुग्णांना बुलडाण्याचा आधार

सीमावर्ती जिल्ह्यातील १२५ रुग्णांना बुलडाण्याचा आधार

प्रामुख्याने बुलडाणा आणि खामगाव या दोन ठिकाणी या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. बुलडाणा जिल्ह्याची सीमा ही मध्य प्रदेश, जळगाव खान्देश, अैारंगाबाद, जालना, वाशिम या जिल्ह्यांना भिडते. या जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील रुग्णांना बुलडाणा जिल्ह्यात उपचार घेणे सोईस्कर ठरते. त्यामुळे या रुग्णांचा बुलडाण्याकडे अधिक ओढा असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातल्या त्यात बुलडाणा येथील काेविड समर्पित रुग्णालयाचा नावलौकिक सीमावर्ती भागात पोहोचला आहे. त्यामुळे या भागातील कोरोनाचे संदिग्ध रुग्ण हे बुलडाणा जिल्ह्यात उपचारासाठी येत आहेत. अगदी अैारंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील काही गावांतील संदिग्धांनी बुलडाणा जिल्ह्यात उपचारासाठी पसंती दिल्याचे निदर्शनास येत आहे. या जिल्ह्यांचा सीमावर्ती भाग हा भौगोलिकदृष्ट्या बुलडाणा जिल्ह्याशी मिळताजुळता असल्याने हे रुग्ण बुलडाणा जिल्ह्यात येत आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत १२५ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार करण्यात आले असून, उपचारादरम्यान यातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे यासंदर्भातील नोंदी करण्यात येत आहे.

दरम्यान, सध्या वाशिम जिल्ह्यातील केनवड येथील २, मंगरूळपीर येथील दोन, अकोला जिल्ह्यातील पातूर येथील ४, बाळापूर २, अकोला १, तेल्हालारा २, जळगाव १, जालना जिल्ह्यातील २, नागपूर २, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील एक, अैारंगाबाद जिल्ह्यातील १ याप्रमाणे २० रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत.

Web Title: Bullying of 125 patients in border districts