बुलडाणा जिल्हा परिषदेची सत्ता पुन्हा महिलांच्या हाती!

By Admin | Updated: June 11, 2016 03:05 IST2016-06-11T03:05:07+5:302016-06-11T03:05:07+5:30

ओबीसी महिलेसाठी आरक्षण जाहीर.

Buldhana Zilla Parishad's power again in the hands of women! | बुलडाणा जिल्हा परिषदेची सत्ता पुन्हा महिलांच्या हाती!

बुलडाणा जिल्हा परिषदेची सत्ता पुन्हा महिलांच्या हाती!

बुलडाणा: राज्यातील जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत आज बुलडाणा जिल्हा परिषदेचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी जाहीर करण्यात आले. त्यामुळे पुन्हा बुलडाणा जिल्हा परिषदेवर महिला राज येणार आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा जिल्हा परिषदेवर आतापर्यंंत पाच महिलांनी कारभार पाहिला आहे. बुलडाणा जिल्हा परिषद कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या ताब्यात नसल्यामुळे सध्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अडीच-अडीच वर्षासाठी अध्यक्षपद घेतले आहे. त्यानुसार सध्या बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अलका खंडारे विराजमान आहेत. यापूर्वी १९९७-९८ मध्ये महिला आरक्षण असल्यामुळे काँग्रेसच्या नंदा कायंदे, जि.प. अध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या. २00५-२00६ मध्ये महिला मागासवर्गीय आरक्षण निघाल्यामुळे काँग्रेसच्या अनिता रणबावरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. २0१३-१४ मध्ये ओबीसी सर्वसाधारण आरक्षण निघाले होते. यावेळी काँग्रेसच्या वर्षा वनारे यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर आता २0१४-१५ मध्ये काँग्रेसच्या अलका खंडारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता पुन्हा राज्यातील जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत ओबीसी महिलेसाठी बुलडाणा जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा बुलडाणा जिल्हा परिषदेवर महिला राज येणार असून या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे.

Web Title: Buldhana Zilla Parishad's power again in the hands of women!