Buldhana: दुचाकी अपघातात घाटपुरी च्या दोन तरुणांचा मृत्यू
By अनिल गवई | Updated: October 1, 2023 14:19 IST2023-10-01T14:17:24+5:302023-10-01T14:19:45+5:30
Buldhana: दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना एमआयडीसी परिसरात घडली.

Buldhana: दुचाकी अपघातात घाटपुरी च्या दोन तरुणांचा मृत्यू
- अनिल गवई
खामगाव (बुलढाणा) - दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना एमआयडीसी परिसरात घडली.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, घाटपुरी येथील पोस्टमन कॉलनीतील शंकर तांदळे ३० आणि गोपाल गंगतीरे २५ दोघे दुचाकीने एमआयडीसी परिसरातून जात होते. दरम्यान, अज्ञात वाहनाने कट मारल्यानंतर दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर अनियंत्रित झालेली दुचाकी रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. यात दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत युवकाना सुरूवातीला खामगाव येथील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. प्रथमोपचारानंतर दोन्ही युवकांना पुढील उपचारार्थ अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, अकोला येथे उपचार सुरू असताना, एका युवकाचा रात्री १२ वाजता नंतर मृत्यू झाला. त्यानंतरही काही कालावधी लोटत नाही तोच दुसर्या युवकाचीही प्राणज्योत मालविली. या घटनेमुळे घाटपुरी परिसरात एकच शोककळा पसरली आहे.