बुलडाणा : मलकापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकची धडक; एक ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:31 IST2018-02-06T00:29:25+5:302018-02-06T00:31:48+5:30
मलकापूर (बुलडाणा): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर शहरापासून काही अंतरावर असलेल्या लक्ष्मीनगर जवळ दोन ट्रक ची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 1 चालक ठार तर अन्य दोघे जखमी झालेत. ही घटना सोमवारी रात्री 10.30 वाजे दरम्यान घडली.

बुलडाणा : मलकापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकची धडक; एक ठार, दोन जखमी
ठळक मुद्देसोमवारी रात्री १0.३0 वाजता घडली दुर्घटनाट्रकचे टायर फुटल्याने घडली घटना, चालक ठारजखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात भरती केले आहे
ऑनलाइन लोकमत
मलकापूर (बुलडाणा): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर शहरापासून काही अंतरावर असलेल्या लक्ष्मीनगर जवळ दोन ट्रक ची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चालक ठार तर अन्य दोघे जखमी झालेत. ही घटना सोमवारी रात्री 10.30 वाजे दरम्यान घडली.
या अपघातात एम.एच.18 ए. ए. 7744 व जी.झेड 10 झेड 9919 या क्रमांकाच्या ट्रक मध्ये समोरासमोर धडक झाली. यापैकी एका ट्रकचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये एम.एच.18 ए. ए. 7744 या क्रमांकाच्या ट्रकचा चालक ठार झाला. दोन्ही ट्रक मधील अन्य दोघे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात भरती केले आहे.