विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 10:17 IST2020-05-06T10:17:41+5:302020-05-06T10:17:59+5:30

पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ५ मे रोजी बुलडाणा तालुक्यातील दहीद बु. व लोणार तालुक्यातील उदनापूर येथे घडली.

Buldhana : Two drowned in the well | विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू

विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: विहिरीतील पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ५ मे रोजी बुलडाणा तालुक्यातील दहीद बु. व लोणार तालुक्यातील उदनापूर येथे घडली. ह्या दोन्ही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत.
धाड: बुलडाणा तालुक्यातील दहीद बु. येथील एका सहा वर्षीय बालकाचा विहिरीतील पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची घटना ५ मे रोजी दुपारी घडली. दहीद बु. येथील साई चरणसिंग राजपूत (०६) हा मुलगा काही मुलांसोबत दहीद खु. शिवारातील एका विहीरीत पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान, पोहताना साईचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. या संदर्भात रामसिंग इंद्रसिंग राजपूत यांनी धाड पोलिसांना माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी धाड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास धाड पोलिस करत आहे.
कोयाळा दहातोंडे : विहिरीवर पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उदनापूर येथे ५ मे रोजी सकाळी घडली. उदनापूर येथील एकनाथ मुळे (२२) हा युवक मंगळवारी सकाळी गावाशेजारील विहिरीवर मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. मात्र त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिस पाटिल राजू मुळे यांनी दिली. याप्रकरणी लोणार पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

Web Title: Buldhana : Two drowned in the well