buldhana: सकल मराठा समाजाचे खामगावात ठिय्या आंदोलन, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा
By अनिल गवई | Updated: September 8, 2023 15:53 IST2023-09-08T15:52:28+5:302023-09-08T15:53:00+5:30
buldhana: मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी ठिय्या आंदोलनास सुरूवात करण्यात आली. या आंदोलनात सकल मराठा समाजाचे नेते मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

buldhana: सकल मराठा समाजाचे खामगावात ठिय्या आंदोलन, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा
- अनिल गवई
खामगाव - मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी ठिय्या आंदोलनास सुरूवात करण्यात आली. या आंदोलनात सकल मराठा समाजाचे नेते मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना, या आंदोलनावर पोलीसांनी हल्ला चढविला. या आंदोलनाच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान, मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी तसेच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविण्यासाठी खामगाव येथील सकल मराठा समाजाच्यावतीने ८ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या कालावधीत ठिय्या आंदोलन आयोजित केले. शुक्रवारी दुपारी स्थानिक सकल मराठा समाजाचे नेते आणि पदाधिकारी यावेळी मोठ्यासंख्येने सहभागी होते.