Buldhana: भरधाव बोलेरोची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार, धडकेनंतर दुचाकीने घेतला पेट, लोखंडा फाट्यावरील घटना
By अनिल गवई | Updated: May 4, 2023 11:33 IST2023-05-04T11:31:52+5:302023-05-04T11:33:39+5:30
Buldhana: भरधाव बोलेरोने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार झाला. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर लगेचच दुचाकीने पेट घेतला. ही घटना खामगाव - चिखली रस्त्यावरील लोखंडा फाट्यावर बुधवारी रात्री उशीरा घडली.

Buldhana: भरधाव बोलेरोची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार, धडकेनंतर दुचाकीने घेतला पेट, लोखंडा फाट्यावरील घटना
- अनिल गवई
बुलढाणा - भरधाव बोलेरोने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार झाला. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर लगेचच दुचाकीने पेट घेतला. ही घटना खामगाव - चिखली रस्त्यावरील लोखंडा फाट्यावर बुधवारी रात्री उशीरा घडली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, एसटी महामंडळात चालक असलेले रविंद्र सवाईराम जाधव वय ४८ हे खामगाव येथून जानेफळ कडे जात होते. दरम्यान, लोखंडा फाट्यावर एमएच २८ बीबी ५२४६ क्रमांकाच्या मालवाहू जीपने दुचाकीला जबर धडक दिली. धडकेनंतर काही अंतरापर्यंत दुचाकीला घासत नेले. त्यामुळे पेट्रालची गळती होऊन दुचाकीने जागीच पेट घेतला. तर दुचाकीस्वार रविंद्र सवाईराम जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी मृतवस्थेत दुचाकी स्वाराला खामगाव येथील सामान्य रूग्णालयात दाखल केले. पोलीसांनी घटनास्थळ गाठत, पंचनामा केला. पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.