बुलडाणा : विजय चांदा खून प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 01:18 IST2018-01-18T01:08:10+5:302018-01-18T01:18:30+5:30

धाड : बुलडाणा तालुक्यातील मढ येथील विजय चांदा या ३६ वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयाने २0 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Buldhana: Police custody of accused in Vijay Chanda murder case | बुलडाणा : विजय चांदा खून प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी

बुलडाणा : विजय चांदा खून प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी

ठळक मुद्देमढ गावानजीक दोन किलोमीटर अंतरावर विजय चांदा याचा मृतदेह एका खड्डय़ात पुरून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला होतापूर्ववैमनस्यातून त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला होता

लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : बुलडाणा तालुक्यातील मढ येथील विजय चांदा या ३६ वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयाने २0 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मढ गावानजीक दोन किलोमीटर अंतरावर विजय चांदा याचा मृतदेह एका खड्डय़ात पुरून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला होता. यामध्ये प्राथमिक पाहणी करून मृतकास धारधार शस्त्राने वार करून त्याचा निर्घृण खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पूर्ववैमनस्यातून त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त करून पोलिसांना माहिती दिली होती. 
या घटनेत पोलिसांनी आरोपी ईश्‍वर रामचंद्र खालोद व त्याचे तीन मुले महिपाल, दिवाण, गोपाल तसेच विजय नारायण बालोद या पाच जणांना अटक केली. १७ जानेवारी २0१७ रोजी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना २0 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील अधिक तपास पीएसओ संग्राम पाटील व त्यांचे सहकारी करत आहेत.    

Web Title: Buldhana: Police custody of accused in Vijay Chanda murder case