शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

कांदा बीजोत्पादकांच्या मानगुटीवर पुन्हा ‘अवकाळी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 11:38 IST

Onion seed growers hit by unseasonal rain २० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले.

- सुधीर चेके पाटील  लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : सतत नुकसान, दुबार पेरणी, अशा संकटामुळे दुष्काळाच्या पांघरुणाखाली दबत चाललेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, कापूस या प्रमुख पिकांनी पुरते गारद केले.  आता कांदा पीक तरी आशावादी चित्र घेऊन येईल, या आशेवर शेतकरी होता; परंतु १८ , १९ आणि २० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. सोसाट्याचा वारा, पाऊस आणि गारपीटीने कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.चिखली तालुक्यात जवळपास तीन दिवस अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीमुळे उशिरा पेरणी झालेल्या गहू, हरभरा, मका, आंबा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. प्रामुख्याने याचा जबर तडाखा कांदा पिकाला बसला. तालुक्यातील सुमारे २ हजार ५०० हेक्टरावर यंदा कांद्याची लागवड झालेली आहे. यामध्ये ४३० हेक्टरावर खाण्यासाठीचा, तर उर्वरित कांद्याचे पीक हे बियाण्यासाठी लागवड केलेला आहे. कांदा बीजोत्पादनाचे पीक सर्वांत नाजूक पीक आहे. यास सोसाट्याचा वारा देखील सहन होत नाही. अशा स्थितीत गारपिटीचा तडाखा बसल्याने ऐन बहारात असलेले पीक शेतकऱ्यांपासून हिरावले गेले. निसर्गाच्या अवकृपेने पूर्वीच खरिपासह रब्बी हंगामातील पिकांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. हातातोंडाशी आलेला कांदा तरी काही आशा घेऊन येईल, अशी आस होती; पण त्यावरही अवकाळी पावसाने पाणी फेरले. कांदा बियाणे पिकाचा शासनाच्या मदत यादीत समावेश होण्याचा मुद्दा त्यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला.कांदा बियाणे पिकाचा शासनाच्या अधिकृत यादीमध्ये समावेश नसल्याने या पिकाला कोणताही हमीभाव ठरवून दिल्या जात नाही. नैसर्गिक आपत्तीत मदत मिळत नाही. पीकविम्यातही समावेश नाही. या पिकाला शासनाने संरक्षण द्यावे, ही मागणी १८ वर्षांपासून प्रलंबित आहे. मध्यंतरी केवळ एकदा कांदा बियाणे पिकाला शासनाच्या मदत यादीतील समावेशासाठी तत्त्वत: मान्यता मिळाली. मात्र, पुढे ती बाब पुन्हा लालफितशाहीत अडकली. 

‘हायरिस्क’ असतानाही पीकविम्यात समावेश नाहीकांदा बीजोत्पादनात चिखली तालुका आशिया खंडात सर्वांत पुढे होता. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याने आता कांदा बीजोत्पादनाचे प्रमाण कमालीचे घसरले आहे.  सातत्याने अवकाळी पावसामुळे नकुसान हे समीकरण ठरलेलेच. त्यामुळे विम्याचे कवच या पिकास प्राधान्याने देणे गरजेचे आहे. 

अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या कांद्याला जबर फटका बसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची होणारी आर्थिक कोंडी पाहता नुकसानभरपाई द्यावी.                  - सुभाष खेडेकर, कांदा बीजोत्पादक, अंत्री खेडेकर

गेल्या अधिवेशनात हा प्रश्न लावून धरला होता; परंतु आघाडी सरकारला शेतकरी हिताशी काहीच देणेघेणे नसल्याचे दिसून आले. असे असले तरी कांदा बीजोत्पादक शेतकऱ्यांचा जोपर्यंत शासनाच्या मदत यादीत समावेश होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.- श्वेता महाले, आमदार, चिखली 

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखलीagricultureशेतीFarmerशेतकरी