शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

बुलडाणा : दुसरबीड नाक्याजवळ २७ लाखांच्या चलनातून बाद झालेल्या नोटा जप्त; पाच जणांना अटक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 2:09 AM

किनगाव राजा (बुलडाणा): किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या दुसरबीड नाक्याजवळ वाशिम जिल्ह्यातून आलेल्या एका वाहनातून चलनातून बाद झालेल्या २६ लाख ४५ हजाराच्या जुन्या नोटा पकडल्याची घटना रविवारी रात्री २ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी किनगाव राजा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.

ठळक मुद्देअटक करण्यात आलेल्यांमध्ये अकोल्यातील एकाचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्ककिनगाव राजा (बुलडाणा): किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या दुसरबीड नाक्याजवळ वाशिम जिल्ह्यातून आलेल्या एका वाहनातून चलनातून बाद झालेल्या २६ लाख ४५ हजाराच्या जुन्या नोटा पकडल्याची घटना रविवारी रात्री २ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी किनगाव राजा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.सिंदखेडराजा तालुक्यातील किनगावराजा हद्दीत २८ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक किशोर शेरकी सोबत पोलीस कर्मचारी दत्तात्रय लोढे गस्तीवर असताना त्यांना वाशिम जिल्ह्यातून एक कार चोरी करून मेहकरवरून सिंदखेडराजाकडे जात असल्याची माहिती नियंत्रण कक्षाने दूरध्वनीद्वारे दिली. या माहितीच्या आधारे  पोलीस उपनिरीक्षक किशोर शेरकी यांनी किनगाव राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राज्य महामार्ग क्रमांक १८३ रस्त्यावर नाकाबंदी करून सदर कार ताब्यात घ्या,  असे कर्मचार्‍यांना कळविले. त्यावरून सहाय्य पोलीस निरीक्षक जनार्धन शेवाळेसोबत पोलीस कर्मचारी अनिल खार्डे, गणेश बांडे, गजानन सानप, विष्णू सानप, नाजूकराव वानखडे, चालक  विनोदसिंग राजपूत यांनी दुसरबीड टोल नाका येथे राज्य महामार्ग क्रमांक १८३ रस्त्यावर रात्री २ वाजताच्या दरम्यान नाकाबंदी करून वाहने तपासणी करण्यास सुरुवात केली. यावेळी सिंदखेडराजाकडून  एम. एच. २८ ए. एन. २१९५  वाहन  येताना दिसली. कारला थांबवून कार चालकाला नाव, गाव विचारले असता, त्याने त्यांचे नाव व गाव घाबरलेल्या अवस्थेत सांगितल्याने पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी कारमधील व्यक्तींना विचारपूस केली असता, सादीक खान मोहम्मद अली खान वय ३६ रा.गैबी नगर नांदुरा जि. बुलडाणा, पार्थ अविनाश लोंढे वय २५ रा. रेणुकानगर, जि. अकोला, मुकेश गोकुळ पाटील वय २६ रा.जुना फैल खामगाव जिल्हा बुलडाणा, मो.साबीर शे. युसूफ वय ४२ रा.नांदुरा जि. बुलडाणा व प्रशांत भुजंगराव निंबाळकर, वय ४१ रा. नांदुरा जिल्हा बुलडाणा अशी नावे सांगितली. त्यावेळी वाहनाची झडती घेतली असता, वाहनाच्या मागच्या डिक्कीत एका वायरच्या थैलीत भारतीय बनावटीच्या चलनातून बाद केलेल्या एक हजार रुपयांच्या १३६८ जुन्या नोटा किंमत १३ लाख ६८ हजार रुपये व ५00 रुपयांच्या २५५४ नोटा किंमत १२ लाख ७७ हजार रुपये अशा एकूण २६ लाख ४५ हजार रुपये रोख रकमेच्या जुन्या नोटा चलनातून बाद केलेल्या आढळून आल्या.  यावेळी चलनातून बाद केलेल्या जुन्या नोटा कोठून आणल्या? व कोठे नेणार आहात? या नोटा कुणाच्या मालकीच्या आहेत? याबाबत विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने दोन पंचांसमक्ष पंचनामा प्रमाणे जप्त करून पाचही आरोपींना अटक करण्यात आली. यावेळी चलनातून बाद केलेल्या नोटा २६ लाख ४५ हजार रुपये,  ७ लाख रुपये किमतीचे वाहन तसेच वेगवेगळ्या कंपनीचे मोबाइल अंदाजे किंमत ११ हजार ५00 रुपये असा एकूण ३३ लाख ५६ हजार ५00 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी  अधिक तपास पोलीस अधीक्षक मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर शेरकी करीत आहेत. 

रॅकेट उघडकीस  येण्याची शक्यता!दुसरबीड नाक्याजवळ एका वाहनातून चलनातून बाद झालेल्या २६.४५ लाखाच्या जुन्या नोटा पकडण्यात आल्यामुळे जिल्ह्यात जुन्या नोटा बदलून देणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीकोनातून पोलीस तपास करीत आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAkola cityअकोला शहर