Buldhana: मलकापूर येथील तरुणाचा पूर्णेच्या पात्रात बुडून मृत्यू
By विवेक चांदुरकर | Updated: March 11, 2024 19:06 IST2024-03-11T19:06:11+5:302024-03-11T19:06:31+5:30
Buldhana News: मलकापूर येथील सालीपूरा भागातील १८ वर्षीय तरुणाचा पूर्णेच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना खान्देशातील कोथळी येथील मुक्ताबाई मंदिरानजीक १० मार्च रोजी सायंकाळी घडली. ११ मार्च रोजी सकाळी तरुणाचा मृतदेह आढळला.

Buldhana: मलकापूर येथील तरुणाचा पूर्णेच्या पात्रात बुडून मृत्यू
- विवेक चांदूरकर
मलकापूर - येथील सालीपूरा भागातील १८ वर्षीय तरुणाचा पूर्णेच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना खान्देशातील कोथळी येथील मुक्ताबाई मंदिरानजीक १० मार्च रोजी सायंकाळी घडली. ११ मार्च रोजी सकाळी तरुणाचा मृतदेह आढळला.
येथील सालीपूरा भागातील रहिवासी गोकुळ दारासिंग राजपूत (वय १८) हा इयत्ता १२ वी चा विद्यार्थी होता. १० मार्च रोजी सहकारी मित्रांसोबत तो देवदर्शनासाठी गेला. सायंकाळी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील मुक्ताबाईच्या दर्शनानंतर तो पूर्णा नदीवर पोहाेचला.
सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गोकुळ दारासिंग राजपूत पाय घसरून पूर्णेच्या पात्रात पडला. त्यामुळे नदीच्या काठावर उभे असलेल्या लोकांनी व सहकारी तरुणांनी आरडाओरडा केली. मात्र गोकुळ पाण्यात बुडाला. या घटनेत काहींनी गोताखोरांना पाचारण केले मात्र अंधार पडल्याने शोध थांबविण्यात आला. सोमवारी सकाळी माजी नगराध्यक्ष अँड हरीश रावळ सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतकाचे नातेवाईक रात्री पासूनच तळ देऊन होते. त्यानंतर पुन्हा एकदा गोताखोरांची शोध मोहीम सुरू झाली. दोन तासांनी गोकुळचा मृतदेह आढळून आला.