Buldhana: जीप-ऑटोची समोरासमोर धडक, मुलगी आणि आईचा मृत्यू, झाडेगावजवळ घडली घटना
By विवेक चांदुरकर | Updated: February 19, 2024 14:13 IST2024-02-19T14:13:27+5:302024-02-19T14:13:46+5:30
Buldhana News: लग्न समारंभ आटोपून घरी येत असताना झाडेगावजवळ आल्यानंतर ऑटोला जीपने धडक दिल्याने पाच वर्षांची मुलगी व आई ठार झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली. मानेगाव येथील रहिवासी रुखमा शांताराम रत्नपारखी त्यांची सासू आणि दाेन मुलीसह लग्नसमारंभाला गेल्या होत्या.

Buldhana: जीप-ऑटोची समोरासमोर धडक, मुलगी आणि आईचा मृत्यू, झाडेगावजवळ घडली घटना
- विवेक चांदूरकर
मानेगाव - लग्न समारंभ आटोपून घरी येत असताना झाडेगावजवळ आल्यानंतर ऑटोला जीपने धडक दिल्याने पाच वर्षांची मुलगी व आई ठार झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली. मानेगाव येथील रहिवासी रुखमा शांताराम रत्नपारखी त्यांची सासू आणि दाेन मुलीसह लग्नसमारंभाला गेल्या होत्या. परत येताना झाडेगाव जवळ एमएच १९ बीयू ९६३७ क्रमांकाच्या ऑटोला नांदुऱ्याकडून पिंपळगाव काळेकडे जात असलेल्या जीपने धडक दिली.
या अपघातात पूर्वी शांताराम रत्नपारखी (वय ५ वर्षे) ठार झाली. तिची आई रुख्मा शांताराम रत्नपारखी (वय ३८) यांना गंभीर अवस्थेत खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात हिंगणे मानकर येथील रमेश वैतकार यांच्यासह ऑटोचालक जखमी झाले. अपघात झाल्यानंतर जीपचा चालक फरार झाला. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करीत आहेत. घटनास्थळी झाडेगाव पोलीस पाटील सारंगधर खाळपे आणि श्रीनाथ यांच्यासह मानेगाव, झाडेगाव येथील रहिवाशींनी जखमींना तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.