Buldhana: अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू, शहापूर-वाडेगाव रसत्यावरील घटना
By अनिल गवई | Updated: May 4, 2024 16:11 IST2024-05-04T16:10:52+5:302024-05-04T16:11:41+5:30
Buldhana News: शौचास जात असलेल्या एका वृध्द इसमास भरधाव वाहनाने जबर धडक दिली. यात वृध्दाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री शहापूर वाडेगाव रस्त्यावर घडली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

Buldhana: अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू, शहापूर-वाडेगाव रसत्यावरील घटना
- अनिल गवई
खामगाव - शौचास जात असलेल्या एका वृध्द इसमास भरधाव वाहनाने जबर धडक दिली. यात वृध्दाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री शहापूर वाडेगाव रस्त्यावर घडली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, शहापूर येथील गणेश महादेव क्षीरसागर (३४, ह.मु. चरणगाव ता. पातूर जि. अकोला ) यांनी तक्रार दिली की, त्यांचे वडील महादेव मोतीराम क्षीरसागर ७२ हे शहापूर येथील टॉवर जवळील शेतात शौचास गेले होते. त्यावेळी भरधाव वाहन चालकाने त्यांना जबर धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३०४(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस नायक बाळकृष्ण फुंडकर करीत आहेत.