बुलडाणा जिल्ह्याची दुधावरची तहान ताकावर!
By Admin | Updated: November 24, 2014 00:30 IST2014-11-24T00:30:16+5:302014-11-24T00:30:16+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील पशुधन घटले, दुग्धव्यवसायावर अवकळा.

बुलडाणा जिल्ह्याची दुधावरची तहान ताकावर!
बुलडाणा : ग्रामीण भागात पशुधनाची संख्या घटल्यामुळे दुग्ध व्यवसायावर अवकळा आल्याचे चित्र आतापासूनच निर्माण झाली आहे. या जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर बनणार आहे. पाणी व वैरणा अभावी दुध उत् पादनावर आतापासून परिणाम होत आहे. एकेकाळी ग्रामीण भागात दुधाचा सुकाळ होता. प्रत्येक घरी एकतरी दुधाळ जणावर असल्यामुळे दुधाची कमतरता भासत नव्हती. आता गवाखेड्यातही पाकिटचे दूध खरेदी करून दुधाची तहान ताकावर भागवावी लागत आहे. बुलडाणा जिल्ह्यात ६ लाख जनावरांची संख्या आहे. यामध्ये आता मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. दुधाळ जनावरांची घट झाल्याने आज घडीला २0 ते २५ हजार लिटर बाहेर जिल्ह्यातून येत आहे.
काही वर्षेपर्यंत गावखेड्यात जनावरांचे कळप दिसत होते. गायी, म्हशी ही जनावरे बहुतेक शेतकर्याकडे असायची. परंतु अलीकडे शेतीचे तुकडे होत गेली. त्यामुळे शेतीतून निर्माण होणारा चाराही कमी झाला.परिणामी चराईक्षेत्र कमी होत गेले. सातत्याने कमी होत चाललेल्या प्रजन्यमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालवत गेली आणि विहीरी, तलाव, धरणे कोरडे पडू लागली आहेत. त्यामुळे वैरणा बरोबरच जनावर्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. जिथे माणसाला पिण्यासाठी पाणी उ पलब्ध होत नाही तिथे जनावरांसाठी कुठून आणायचे या समस्येमुळे शेतकर्यांच्या खुट्यावरील जनावरांची संख्या घटत चालली आहे. दुसरीकडे तांत्रीक शेतीचा वापर वाढल्याने बैलांची गरज कमी झाली आहे. या पशुधनामध्ये वाढ व्हावी, किमान दुधाळ जनावरांची संख्या वाढावी म्हणून शासन स्तरावर वेळोवेळी प्रय त्नही होतात मात्र, त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. म्हणूनच खेड्यातून येणारे दुध कमी झाले. गावात तयार झालेले दूध पशुपालकांनाच पुरत नाही. बुलडाणा जिल्ह्यात सिंचनाचा मोठा अनुशेष आहे. त्याचाही परिणाम दुधाळ जनावरांवर होत आहे.