शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

बुलडाणा जिल्ह्यातील पालिकांच्या कर वसुलीचे ‘घोडे’ अडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 17:21 IST

खामगाव: मालमत्ता  कराच्या वसुलीत बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे ‘घोडे’ अडल्याचे चित्र आहे. मालमत्ता कराच्या वसुलीत जळगाव जामोद नगर पालिकेचा अपवाद वगळता एकाही पालिकेला सूर गवसलेला नाही.

ठळक मुद्दे  जळगाव जामोदचा अपवाद: देऊळगाव राजा आणि  खामगाव काठावर पास. मेहकर,  मलकापूर पालिकेसह मोताळा नगर पंचायतीची सुमार कामगिरी. मालमत्ता कराच्या निचांक्की आकडेवारीत मलकापूर, मेहकर नगर पालिकांसह मोताळा नगर पंचायत आघाडीवर आहे.

 - अनिल गवई

खामगाव: मालमत्ता  कराच्या वसुलीत बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे ‘घोडे’ अडल्याचे चित्र आहे. मालमत्ता कराच्या वसुलीत जळगाव जामोद नगर पालिकेचा अपवाद वगळता एकाही पालिकेला सूर गवसलेला नाही. कर वसुलीसाठी अवघे २०-२१ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे इतक्या कमी दिवसांमध्ये या पालिकांच्या कर वसुलीची उद्दीष्टपूर्ती होणार तरी कशी? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

       स्थानिक स्वराज्य संस्थांना शासकीय अनुदानासाठी राज्य शासनाने मालमत्ता आणि पाणी पट्टी वसुलीची सक्ती केली आहे. प्रत्येक नगर पालिका आणि पंचायत समितीला १०० टक्के करवसुलीची सक्ती करण्यात आली.  मात्र, शासनाच्या या कसोटीत आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील केवळ  जळगाव जामोद  पालिका  खरी उतरली आहे. उर्वरित १० पालिका आणि दोन नगर पंचायतींची कामगिरी अतिशय सुमार असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते. 

सन २०१७-१८ या आर्थिक वर्षांमध्ये कर वसुलीसाठी बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद या एकमेव पालिकेने लक्ष केंद्रीत केले. तर उर्वरित पालिका आणि नगर पंचायतींनी अपेक्षीत प्रयत्न केले नसल्याचे दिसून येते.  उपलब्ध आकडेनुसार माहे १ एप्रिल, २०१७ ते ०३ मार्च, २०१८ पर्यंतच्या कालावधीत कर वसुलीत बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगर पालिकेने सर्वाधिक ९६.२३ टक्के मालमत्ता कराची वसुली केली आहे.  तर देऊळगाव राजा पालिकेने ४०.५६ टक्के कर वसुली करीत दुसरे स्थान पटकाविले आहे. तर खामगाव पालिका (३६.१०) तिसºया स्थानावर आहे. तर मालमत्ता कराच्या निचांक्की आकडेवारीत मलकापूर, मेहकर नगर पालिकांसह मोताळा नगर पंचायत आघाडीवर आहे.

कर वसुलीत जिल्ह्यातील १० पालिका माघारल्या!

 मालमत्ता कराच्या अपेक्षीत वसुलीसाठी जिल्ह्यातील पालिका प्रशासन आता चांगलेच कामाला लागले आहे. नागरिकांचा अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याने मालमत्ता जप्ती, नळ कनेक्शन कापण्याची कारवाई, थकबाकीदाराच्या दारावर डफडे बजाव मोहिम, थकबाकीदारांच्या याद्या चौका-चौकात झळकविण्याच्या मोहिमेसोबतच काही बड्या थकबाकीदारांना कायदेशीर नोटीसही देण्यात येत आहेत. कारवाईच्या बडग्यामुळे कराचा भरणा करण्यासाठी नागरिक समोर येत आहेत.   दरम्यान, कर वसुलीत ११ पैकी १० पालिका कमालिच्या माघारल्या आहेत. यामध्ये मलकापूर पालिकेसोबतच मोताळा पंचायत समितीचा समावेश आहे. मोताळा पंचायत समितीची अवघी ६ टक्के कर वसुली झाल्याचे दिसून येते. तर संग्रामपूर पंचायत समितीची कामगिरीही सुमार असल्याचे दिसून येते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव