लोणारमध्ये पार पडला भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचा जिल्हा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 13:25 IST2017-12-12T13:23:29+5:302017-12-12T13:25:59+5:30
लोणार : बुलडाणा जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा पदाधिकारी मेळावा रविवारला लोणार येथील आनंद मंगल कार्यालय पार पडला.

लोणारमध्ये पार पडला भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचा जिल्हा मेळावा
लोणार : बुलडाणा जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा पदाधिकारी मेळावा रविवारला लोणार येथील आनंद मंगल कार्यालय पार पडला. या मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शहरातील आनंद मंगल कार्यालयात बुलडाणा जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा पदाधिकारी मेळाव्यात सत्कार समारंभचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जमाल सिद्दिकी यांचा सत्कार भाजपा तालुका कार्यकरणीच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर भाजपाला सर्व जीवन समर्पित करून कार्य करणाºया निर्मल संचेती यांचा सत्कार भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दिकी यांच्या हस्ते करण्यात आला. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करण्याच्या दृष्टीने पक्ष कार्य करीत असून ‘सबका विकास, हाच आमुचा ध्यास’ असल्याचे जमाल सिद्दिकी यांनी कार्यक्रम प्रसंगी सांगितले. यावेळी किसान आघाडी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, जिल्हा सरचिटणीस विश्वनाथ माळी, भाजपा तालुका अध्यक्ष आॅड.शिवाजी सानप, सुंदर संचेती, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रफीक कुरेशी, अविनाश शुक्ल, शुभम अग्रोया, शुभम दरोगा, सुशील डोंगरवाल, कुशल सुराणा, तुषार बेदमुथा यांचेसह कार्यकर्ते हजर होते.