मिरवणुकीत नाचताना युवकाची चाकूने वार करून हत्या, अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल
By संदीप वानखेडे | Updated: April 15, 2024 13:18 IST2024-04-15T13:17:52+5:302024-04-15T13:18:33+5:30
Buldhana Crime News: मिरवणुकीत नाचताना अज्ञात आराेपींनी युवकावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली़ ही घटना १४ एप्रिल राेजी रात्री घडली़ आशूतोष संजय पडघान (वय २४, जुना अजिसपूर राेड, बुलढाणा) असे मृतकाचे नाव आहे.

मिरवणुकीत नाचताना युवकाची चाकूने वार करून हत्या, अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल
- संदीप वानखडे
बुलढाणा - मिरवणुकीत नाचताना अज्ञात आराेपींनी युवकावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली़ ही घटना १४ एप्रिल राेजी रात्री घडली़ आशूतोष संजय पडघान (वय २४, जुना अजिसपूर राेड, बुलढाणा) असे मृतकाचे नाव आहे़ या प्रकरणी बुलढाणा शहर पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ तसेच आराेपींच्या शाेधासाठी पथके रवाना केली आहेत.
बुलढाणा शहरातून १४ एप्रिल राेजी जयंतीउत्सवानिमित्त मिरवणुक काढण्यात आली हाेती़ या मिरवणुक जयस्तंभ चाैकात येत असताना आशुताेष पडघान याच्यावर अज्ञात आराेपींनी चाकूने वार केले़ तसेच त्याला जखमी अवस्थेत बाजार रस्त्यावरून रुग्णालयात दाखल करण्यात आले़ जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू हाेते़ दरम्यान उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ आशुताेष पडघान हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा हाेता़ त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्याची नाेंद आहे़ त्यामुळे, जुन्या वैमनस्यातून त्याची हत्या झाली असावी, असा अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे़ या प्रकरणी कुणाल सुभाष निकाळजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे़ पुढील तपास बुलढाणा शहर पाेलीस करीत आहेत़ आराेपींच्या शाेधासाठी दाेन पथके स्थापन करण्यात आल्याचे पाेलिसांनी सांगितले़