बुलढाणा: भरधाव ऑटोला रोहीची धडक, चार जण गंभीर जखमी

By संदीप वानखेडे | Updated: December 20, 2023 18:15 IST2023-12-20T18:15:12+5:302023-12-20T18:15:31+5:30

जयंती उत्सवातून परत येणाऱ्या मलकापूर पांग्रा येथील सेवेकऱ्यांच्या ऑटाेवर राेही धडकला.

Buldhana auto collides with Rohi, four seriously injured | बुलढाणा: भरधाव ऑटोला रोहीची धडक, चार जण गंभीर जखमी

बुलढाणा: भरधाव ऑटोला रोहीची धडक, चार जण गंभीर जखमी

साखरखेर्डा (बुलढाणा ) : जयंती उत्सवातून परत येणाऱ्या मलकापूर पांग्रा येथील सेवेकऱ्यांच्या ऑटाेवर राेही धडकला. यामध्ये चार भाविक जखमी झाले. ही घटना वरोडी ते साखरखेर्डा दरम्यान घडली. मलकापूर पांग्रा येथील २० ते २५ सेवाधारी १३ डिसेंबरपासून वरोडी येथे सेवा करण्यासाठी महिला व पुरुष गेले होते. महाप्रसाद घेतल्यानंतर ते मलकापूर पांग्रा येथे ऑटाेने निघाले असता, वरोडी ते साखरखेर्डा रोडवर रोहिने ऑटाेवर उडी मारली.

त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ऑटाे उलटला. यामध्ये मलकापूर पांग्रा येथील अशोक बाभूळकर (६५) वय, विद्या मखमले (५१), गोदावरी राऊत (५५), कांताबाई टेकाळे (५५) हे चार सेवाधारी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडताच इतर वाहनचालकांनी गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुरुशे यांनी प्राथमिक उपचार करून बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात रेफर केले आहे.
 

Web Title: Buldhana auto collides with Rohi, four seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.