शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकांनी १६ लाख कोटी रुपयांवर सोडले पाणी; मोठमोठी कर्जे बुडीत खात्यात, पहिल्या क्रमांकावर कोणती बँक?
2
आता पहिलीपासूनच इंग्रजीबरोबर हिंदीही सक्तीची, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२५: प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, एखादी आनंददायी बातमी मिळेल
4
वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती देण्याचा विचार, सर्वाेच्च न्यायालयाने केले स्पष्ट
5
युद्ध फायद्याचे? सेन्सेक्स ७७ हजारांवर, परदेशी गुंतवणूकदारांकडून देशात पैसे गुंतवणे सुरू
6
आरोपींच्या घरांवर बुलडोझर कारवाई; नागपूर महानगरपालिकेने मागितली बिनशर्त माफी
7
निकाल देईपर्यंत कुणाल कामराला अटक करू नका; शिंदेंवरील आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी हायकोर्टाचा आदेश
8
टॅरिफ युद्ध शिगेला: अमेरिकेने चीनवर लादले २४५ टक्के आयात शुल्क, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
9
१७ कोटी जीएसटी भरा; विद्यापीठाला नोटीस, महाविद्यालय संलग्नता शुल्कावर करआकारणी; भुर्दंड विद्यार्थ्यांना?
10
सुपरओव्हरमध्ये दिल्लीचा राजस्थानवर रोमहर्षक विजय!
11
केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल! कर्मचारी खर्चात कपात; सुधारणांवर फोकस
12
Mumbai Metro 2B: मानखुर्द-चेंबूर मार्गावर मेट्रो रेल्वेची चाचणी, मेट्रो कुठे जोडली जाणार?
13
दस्तनोंदणी दुप्पट; हाताळणी शुल्क ४० रुपये; सरकारला दरमहा मिळतो ४ हजार कोटींचा महसूल
14
राज्यात ‘आनंद गुरुकुल’! सुरू करणार ८ निवासी शाळा, शालेय शिक्षण विभागाचा संकल्प
15
गुरुची विद्या गुरुलाच? ठाकरेंनी आतल्या गोटातून माहिती काढली; भाजपाला शह देण्याची रणनीती आखली
16
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह लवकरच भारत दौऱ्यावर; टॅरिफच्या गोंधळामध्ये पंतप्रधान मोदींशी घेणार भेट
17
कर्नाटकात मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण मिळणार की नाही? आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ठरवणार!
18
भारतीय विद्यार्थ्याने ट्रम्प प्रशासनाविरोधात दाखल केला खटला; अचानक इमिग्रेशन दर्जा रद्द केल्यानंतर कोर्टात धाव
19
भारतीय धावपटूचं शर्यत जिकण्याआधीच सेलीब्रेशन, मागचा पुढं गेला आणि गोल्ड हुकलं!
20
उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन सपकाळांची री ओढली, RSSवर टीका केली; म्हणाले, “मला आवडलं की...”

तीनही मतदारसंघात भाजपची मुसंडी, संचेती सहाव्यांदा, कुटे पाचव्यांदा, फुंडकरांची हॅट्ट्रिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 16:27 IST

Buldhana Assembly Election Result 2024 : २० हजारांपेक्षाही अधिक मतांनी तिघांचाही विजय : काँग्रेसने मलकापूर गमावले

- सदानंद सिरसाट

Buldhana Vidhan Sabha Election Result 2024 Live :  खामगाव (बुलढाणा) : बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील आधीच दोन मतदारसंघ ताब्यात असताना तिसराही म्हणजे मलकापूर मतदारसंघही आता भाजप महायुतीने ताब्यात घेतला आहे. मलकापुरात चैनसुख संचेती, जळगावात डाॅ. संजय कुटे तर खामगावात ॲड. आकाश फुंडकर या तिघांनीही प्रतिस्पर्ध्यापेक्षा तब्बल २० हजारांपेक्षाही अधिक मते घेत विजय मिळवला आहे. त्यापैकी संचेती सहाव्यांदा, डाॅ. कुटे यांचा पाचव्यांदा विजय झाला आहे. तर ॲड. फुंडकर यांची हॅट्ट्रिक झाली आहे.

खामगाव मतदारसंघात महायुतीतील भाजपचे ॲड. आकाश फुंडकर यांना प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार दिलीपकुमार सानंदा यांच्यापेक्षा २५१३८ मते अधिक मिळाली आहेत. त्याचवेळी या दोन्ही उमेदवारांना अनुक्रमे १०४७५६ व ७९६१८ मते मिळाली आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे देवराव हिवराळे यांना २४९९८ मते मिळाली आहेत. जळगाव जामोद मतदारसंघात भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांना १०७३१८ मते मिळाली आहेत. तर काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार डाॅ. स्वाती वाकेकर यांना ८८५४७ मिळाली आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे डाॅ. प्रवीण पाटील यांना १७६४८, तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांना ९९८३ मते मिळाली आहेत. डाॅ. कुटे यांचा १८७७१ मतांनी पाचव्यांदा विजय झाला आहे. मलकापुरात भाजप महायुतीचे चैनसुख संचेती यांचा २०१९ चा अपवाद वगळता त्यांचा सहाव्यांदा विजय झाला आहे. त्यांना यावेळी १०९९२१ मते मिळाली आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेस महाविकास आघाडीचे राजेश एकडे यांना ८३५२४ मते मिळाली आहेत. विजयामध्ये २६३९७ मतांचा फरक आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मो. जमीरुदिन मो. साबीरउदीन यांना ९२५३ मते मिळाली आहेत.

वंचितच्या उमेदवारांच्या मतांचा आघाडीला फटकावंचित बहुजन आघाडीच्या खामगाव आणि जळगाव जामोद मतदारसंघातील उमेदवारांना मिळालेल्या मतांएवढाच विजयी मतांचा फरक आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ती मते मिळाली असती तर मतदारसंघातील चित्र वेगळे असते, अशी चर्चा आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४buldhanaबुलडाणाvidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४malkapur-acमलकापूरkhamgaon-acखामगाव