बुलडाणा : अस्वलाच्या हल्ल्यात ७0 वर्षीय महिला गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 01:12 IST2018-02-14T01:11:46+5:302018-02-14T01:12:03+5:30

Buldhana: A 70-year-old woman is critically injured in her ashwala attack | बुलडाणा : अस्वलाच्या हल्ल्यात ७0 वर्षीय महिला गंभीर जखमी

बुलडाणा : अस्वलाच्या हल्ल्यात ७0 वर्षीय महिला गंभीर जखमी

ठळक मुद्दे शेलसूर शिवारात घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : अस्वलाच्या हल्ल्यात ७0 वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेचार वाजेदरम्यान शेलसूर शिवारात घडली. 
प्राप्त माहितीनुसार, चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील सरुबाई वामन चव्हाण ही महिला शेलसूर शिवारातील कल्पना व्यवहारे यांच्या शेतात मजुरीसाठी गेली होती. दरम्यान दुपारी साडेचार वाजेदरम्यान अचानक अस्वलाने पाठीमागून हल्ला केला. 
याबाबत माहिती मिळताच आजूबाजूच्या शेतात शेळ्या चारणार्‍या महिलांनी आरडाओरड केल्यामुळे अस्वल पळून गेले. 
जखमी अवस्थेतील महिलेस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, तिच्यावर उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच आरएफओ गणेश टेकाळे, वनपाल राहुल चव्हाण, वनरक्षक समाधान मांटे, गवारगुरु, वाघ व संदीप मडावी यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची विचारपूस केली, तसेच पाच हजारांची तत्काळ मदत रुग्णाच्या नातेवाइकांकडे सुपुर्द केली.

Web Title: Buldhana: A 70-year-old woman is critically injured in her ashwala attack