Buldhana: शेगावात ६ जुगारींना अटक, ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त
By विवेक चांदुरकर | Updated: July 5, 2023 16:03 IST2023-07-05T16:02:47+5:302023-07-05T16:03:30+5:30
Buldhana: शेगाव शहर पोलिसांनी छत्रपती शिवाजीनगर परिसरामध्ये धाड टाकून ६ जुगारींना अटक केली असून, रोख रकमेसह ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल ४ जुलै रोजी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास जप्त केला.

Buldhana: शेगावात ६ जुगारींना अटक, ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त
- विवेक चांदूरकर
शेगाव - शहर पोलिसांनी छत्रपती शिवाजीनगर परिसरामध्ये धाड टाकून ६ जुगारींना अटक केली असून, रोख रकमेसह ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल ४ जुलै रोजी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास जप्त केला.
पोलिस उपअधीक्षक विवेक पाटील व पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात शेगाव शहर पोलिसांनी धाड टाकली. सार्वजनिक ठिकाणी मोकळ्या जागेत जुगार खेळणारे छत्रपती शिवाजीनगरमधील रहिवासी मधुकर उत्तमराव जाधव (वय ६७ वर्षे), सुभाष उत्तमराव डांबे (वय ६३ वर्षे), संजय मधुकर तिडके (वय ५६ वर्षे), संदीप चिंतामण देवकर (वय २६ वर्षे), शेख शकील शेख शेख जहुर (वय ५३ वर्षे), सुनील कृष्णराव सोलनकर (वय ५५ वर्षे)यांच्यावर कारवाई करण्यात आली. आरोपींकडून ४२ हजार १२० रुपये जप्त करण्यात आले. आरापींवर जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक नीलेश गाडगे करीत आहेत.