बुलडाणा आठवडी बाजाराने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:33 IST2020-12-29T04:33:00+5:302020-12-29T04:33:00+5:30

त्या पार्श्वभूमीवर तातडीने आमदार गायकवाड यांनी पालिका कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन बाजाराची बैठक व्यवस्था सुरळीत करण्यासोबतच वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली ...

The Buldana weekly market took a deep breath | बुलडाणा आठवडी बाजाराने घेतला मोकळा श्वास

बुलडाणा आठवडी बाजाराने घेतला मोकळा श्वास

त्या पार्श्वभूमीवर तातडीने आमदार गायकवाड यांनी पालिका कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन बाजाराची बैठक व्यवस्था सुरळीत करण्यासोबतच वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यास प्राधान्य दिले होते. मात्र २० डिसेंबर रोजीच्या झालेल्या आठवडी बाजाराच्या दिवशी प्रत्यक्षात या नियोजनाची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. अखरे २७ डिसेंबर रोजी त्यास मुहूर्त निघाला व कागदावरील नियोजन प्रत्यक्षात उतरले.

वाहतूक कोंडीची समस्या सुटली

कोर्ट रोड ते स्टेट बँक राेडवरील व्यावसायिकांना सुटसुटीत पद्धतीने बसविण्यात आल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ते कारंजा चौक, जनता चौक हा भाग मोकळा झाला. दुचाकी, चारचाकीही वाहने या रस्त्याने आता सहजगत्या रविवारच्या दिवशी जाऊ शकत आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांना न बसवता एका बाजूने बसविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात आले. तसेच कपडा बाजारात होणारी मोठी गर्दी पाहता हा बाजार जिल्हा परिषदेच्या मागील बाजूला असलेल्या रस्त्यावर हलविण्यात आला. त्यामुळे आपत्कालीन स्थितीतही येथून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत आहे.

पोलीस व पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली मेहनत

पोलीस कर्मचारी व पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाने बाजारात सकाळीच व्यावसायिकांना नियोजन करून दिल्यामुळे दरवेळी होणार गोंधळ टळला व बाजाराला एक प्रकारे शिस्त लागली.

Web Title: The Buldana weekly market took a deep breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.