बुलडाणा : गुटखा घेवून जाणारी दोन वाहने पकडली; १० लाख रुपयांचा माल जप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 20:23 IST2018-01-12T20:20:35+5:302018-01-12T20:23:37+5:30
डोणगाव (बुलडाणा): अवैध गुटखा घेवून जाणारे दोन वाहने ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता डोणगाव ते मेहकर रोडवर पकडण्यात आले असून, यामध्ये वाहनांसह एकूण १० लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

बुलडाणा : गुटखा घेवून जाणारी दोन वाहने पकडली; १० लाख रुपयांचा माल जप्त!
डोणगाव ते मेहकर
डोणगाव (बुलडाणा): अवैध गुटखा घेवून जाणारे दोन वाहने ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता डोणगाव ते मेहकर रोडवर पकडण्यात आले असून, यामध्ये वाहनांसह एकूण १० लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
शासनाने विक्री, उत्पादन व साठवणूकीसाठी प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून सपोनि आकाश शिंदे यांच्यासोबत पोलिस कर्मचारी विष्णू जायभाये, सुनिल देशमुख, डिगांबर चव्हाण यांनी डोणगाव ते मेहकर गस्त घातली. दरम्यान, त्यांनी दोन वाहनांना थांबवून तपासले असता त्यामध्ये इम्रानखान समीरखान (२६), सलमानखान अफरोजखान (२०) रा.रहमतनगर अमरावती तर दूस-या वाहनात शेख एैफास शे.जाफर (२३), शे.रहीम शे.रशीद (१९) रा.यासीननगर अमरावती हे वाहन क्र.एम.एच. २७ एक्स. ७८२३ व एम.एच.२७ एक्स. ८५१२ मध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करित असल्याचे दिसून आले. त्यांचे ताब्यातून गुटखा व दोन वाहने असा एकूण १० लाख ७६ हजार रूपयेचा माल ताब्यात घेतला आहे.