शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

बुलडाणा : विभाग नियंत्रक अनिल मेहतर यांच्यावर एसीबीचा ट्रॅप; वाहन परीक्षकाच्या बदलीसाठी मागितले दहा हजार रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 19:41 IST

बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा आगारामध्ये वाहन निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्यास  बुलडाणा विभागीय कार्यशाळेत बदली देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्य परिवहन महामंडळाचे बुलडाणा येथील विभाग नियंत्रक अनिल दत्तात्रय मेहतर यांना गुरूवारी सायंकाळी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देराज्य परिवहन महामंडळाचे बुलडाणा येथील विभाग नियंत्रक अनिल दत्तात्रय मेहतरमेहतर यांच्या संपत्तीची होणार चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा आगारामध्ये वाहन निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्यास  बुलडाणा विभागीय कार्यशाळेत बदली देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्य परिवहन महामंडळाचे बुलडाणा येथील विभाग नियंत्रक अनिल दत्तात्रय मेहतर यांना गुरूवारी सायंकाळी ताब्यात घेतले.दरम्यान, रात्री उशिरा पर्यंत लाचेची मागणी केल्या प्रकरणात त्यांच्या आवाजाचे नमूने आणि अन्य प्रक्रिया लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गुंतलेला होता. या प्रकरणात विजय प्रताप पवार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यांचा मामेभाऊ राजकुमार तारासिंग राठोड याच्या विभागीय कार्यशाळेतील बदलीसाठी विभाग नियंत्रक यांनी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याची ही तक्रार २२ डिसेंबर रोजी करण्यात आली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारावर पडताळणी कार्यवाही झाली. त्यामध्ये पंचा समक्ष विभाग नियंत्रक अनिल दत्तात्रय मेहतर (४४,, मुळ रा.रेंदाळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांनी दहा हजार रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले होते. या प्रकरणी अनिल मेहतर यांच्या विरोधात गुरूवारी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम सात आणि १५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक सुनीता नाशीककर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे बुलडाणा येथील पोलिस उपअधीक्षक शैलेष जाधव, एएसआय श्याम भांगे, पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू जवंजाळ, विष्णू नेवरे, पोलिस नाईक संजय शेळके, प्रदीप गडाख, पोलिस कॉन्स्टेबल विजय वारूळे, विजय मेहेत्रे, जगदीश पवार, विनोद लोखंडे, मधुकर रगड यांनी केली. 

संपत्तीची चौकशीदहा हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणात एसीबीने अनिल मेहतर यांना ताब्यात घेतले असले तरी त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नव्हती. मात्र या घटनेमुळे मेहतर यांच्या संपत्तीची मात्र आता लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिली. दरम्यान, गुरूवारी रात्री उशिरापर्यंत अनिल मेहतर यांच्या आवाजचे नमुने व तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीची कारवाई सुरू होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportराज्य परीवहन महामंडळAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग