शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा पोलिसांच्या वाहनाला बीड जिल्ह्यात अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 19:18 IST

बुलडाणा : एका गुन्ह्याच्या तपासात बीड जिल्ह्यात गेलेल्या बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला गेवराईनजीक अपघात होऊन सात पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री घडला.

ठळक मुद्दे सात पोलिस कर्मचारी जखमी जालन्या उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : एका गुन्ह्याच्या तपासात बीड जिल्ह्यात गेलेल्या बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला गेवराईनजीक अपघात होऊन सात पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान, यातील दोघांना गंभीर मार लागला असून त्यांच्यावर जालना येतील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहे. हा अपघात शनिवारी रात्री घडला. जखमीमध्ये दोन महिला पोलिस कर्मचा-यांचाही समावेश आहे.या अपघातामध्ये तपास अधिकारी इमरान इनामदार, चालक शेळके, पथकातील राजेश ठाकूर, अत्ताउल्लाखान  राजेश ठाकूर, महिला कर्मचारी आशा मोरे व खिल्लारे  जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर जालना येथे खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.  बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील  सतत वर्दळीचा व मुख्य बाजारपेठेचा रस्ता असलेल्या येथील डीपी रोडस्थित कृष्ण ज्वेलर्स या सराफा दुकानातून दागिन्यांनी भरलेली बॅग लंपास झाल्याची घटना २३ आॅक्टोबर २०१७ रोजी घडली होती. याप्रकरणी सीसी कॅमेºयाच्या आधारे चिखली पोलिसांनी २८ आॅक्टोबर २०१७ रोजी बीड जिल्ह्यातील गेवराई येथून एका महिला आरोपीस अटक केली होती. तर या प्रकरणातील दोन महिला फरार होत्या. दरम्यान फरार आरोपीपैकी एक महिला आरोपी गेवराई येथे आल्याच्या माहितीवरून बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक पोलिस उपनिरीक्षक इमरान इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली शेवराई येथे गेले होते. दरम्यान संबंधित आरोपी महिला न मिळाल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुलडाण्याकडे परत येत असताना शनिवारी रात्री १० वाजता गेवराई शहराबाहेर अंधार असल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची गाडी समोर असलेल्या उसाच्या बैलगाडीला धडकली.  गाडी वेगात असल्यामुळे बैलगाडीतील उस स्थानिक गुन्हे शाखेच्या गाडीचे समोरील काच फोडून आत शिरले. त्यामुळे गाडीतील चालकासह तपास अधिकारी इमरान इनामदार गंभीर जखमी झाले. इमरान इनामदार यांच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर दखापत झाली असून चालक शेळके, पथकातील राजेश ठाकूर, अत्ताउल्लाखान  राजेश ठाकूर, आशा मोरे, खिल्लारे यांनाही जबर मार लागला आहे. गंभीर जखमी इमरान इनामदार यांच्यावर जालना येथील गपपती हॉस्पिटलमध्ये  शस्त्रक्रिया करण्यात येणार असून इतर कर्मचा-यांवर शासकीयसह खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिसBeedबीडAccidentअपघात