बुलडाणा नगरपालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 11:51 AM2021-02-11T11:51:50+5:302021-02-11T11:51:56+5:30

Buldana municipal Counsil पालिका मुख्याधिकारी व अन्य सहकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले.

Buldana municipal employees strike | बुलडाणा नगरपालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

बुलडाणा नगरपालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  पालिका कर्मचाऱ्यास विकास देयकाच्या कारणावरून शिवीगाळ केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या पालिका कर्मचाऱ्यांनी १० फेब्रुवारी रोजी दिवसभर कामबंद आंदोलन केले. दरम्यान, दुपारी पालिका मुख्याधिकारी व अन्य सहकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले. ९ फेब्रुवारी हा प्रकार घडला होता. नगराध्यक्ष पती मोहम्मद सज्जाद यांनी विकास कामांच्या देयकावरून पालिकेतील कर्मचारी अमोल जीवनसिंग इंगले यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली होती. प्रकरणी पालिका कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, काही नगरसेवकांनी या प्रकरणात मध्यस्थी करत, हे प्रकरण आपसात मिटविल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, त्यानंतर आणखी काही घटामोडी होऊन या प्रकरणी पालिका कर्मचाऱ्यांनी १० फेब्रुवारी रोजी कामबंद आंदोलन करत, पालिकेच्या आवारातच ठिय्या आंदोलन केले. सकाळपासून हे कामबंद आंदोलन सुरू होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पालिका कर्मचारी काहीसे आक्रमक झाले होते. त्यानंतर, नगराध्यक्षा नजुमोन्नीसा मोहम्मद सज्जाद व  पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर, उभय बाजूत समझोता होऊन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनामध्ये पालिका कर्मचारी संघटनेचे जगदेव कार्ले, गणेश मुळे, गजेंद्र राजपूत, गजानन चिंचोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्निल लघाने यांच्यासह अन्य पालिका कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: Buldana municipal employees strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.