शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

 बुलडाणा : घरकूल योजनेचे नियोजन योग्य न झाल्यास आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 1:57 PM

 बुलडाणा : शहरातील जुना गाव परिसरातील लाभार्थ्यांवर घरकूल वाटपात अन्याय झाला असून, बाहेरच्याच मंडळीना घरकूल मिळवून देण्यासाठी आटापिटा सुरु झाला आहे.

ठळक मुद्देडॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर हा वार्ड अनुसुचित जाती-जमातीसाठी राखीव असतानाही दलित वस्ती सुधार फंडाचे लाभार्थी आजही मूलभूत समस्यांपासुन वंचित आहेत. स्व.जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुथ्थान अभियानांतर्गत एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमान्वये घरकुल योजनेला सुुरुवात झाली.मुळ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यापूर्वीच घरकूल यादीत नाव नसताना व झोपडपट्टीत वास्तव्य नसताना सुध्दा बाहेरची मंडळी घरकुल मिळवण्याचा आटापिटा करत आहेत.

 बुलडाणा : शहरातील जुना गाव परिसरातील लाभार्थ्यांवर घरकूल वाटपात अन्याय झाला असून, बाहेरच्याच मंडळीना घरकूल मिळवून देण्यासाठी आटापिटा सुरु झाला आहे. तरी घरकूल योजनेचे नियोजन योग्य करा अन्यथा आंदोलन करु, असा इशारा येथील आंबेडकर मधील नागरिकांनी मुख्याधिकारी यांना एका निवेदनाद्वारे १९ जानेवारी रोजी दिला आहे.  गेल्या ६० वषार्पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर अस्तित्वात आहे. सन १९६४ पासून हा वार्ड अनुसुचित जाती-जमातीसाठी आजपावेतो राखीव वार्ड असतानाही दलित वस्ती सुधार फंडाचे लाभार्थी आजही मूलभूत समस्यांपासुन वंचित आहेत. झोपडपट्टीमध्ये राहावयास पुरेशी जागा नाही. कुडाला कुड लागून नागरिक अतिक्रमण करतात. येण्याजाण्यासाठी रस्ते नाहीत. सांडपाणी वाहुन नेण्यासाठी नाल्या नाहीत. मयत झाल्यास माड बांधण्यासाठी पुरेशी जागा नाही. शौचालय योजनेत तर पाकगृहाजवळ दुसºयाचे शौचालय उभारणे भाग पडले. आता कुठे स्व.जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुथ्थान अभियानांतर्गत एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमान्वये घरकुल योजनेला सुुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यामध्ये दुमजली अठरा घरकुले तयार झाली. मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर मधील मुळ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यापूर्वीच घरकूल यादीत नाव नसताना व झोपडपट्टीत वास्तव्य नसताना सुध्दा बाहेरची मंडळी घरकुल मिळवण्याचा आटापिटा करत आहेत. तरी नगर पालिका प्रशासनान कागदपत्रे तपासून सखोल चौकशी करुनच योग्य लाभार्थ्यांना घरकुल द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे आशिष खरात, प्रदीप बोर्डे, संजय सरदार, सुंदर सरोदे, कैलास गायकवाड, सुनील दाभाडे, अशोक सुरोशे, विनोद गवई, विरेंद्र पडोळकर, गजानन पºहाड, संतोष निकाळजे, अशोक सुरडकर, संतोष पडोळकर, भारती सोमवंशी, पुष्पाबाई जळतकर, अंजना पवार, राहुल जाधव, छाया पडोळकर, लक्ष्मी सोळंके, राजू सरदार, शोभा जाधव,गणेश इंगळे आदींच्या सह्या आहेत. यावेळी अनेक नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना