शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
5
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
6
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
7
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
8
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
9
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
10
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
11
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
12
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
13
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
14
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
15
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
16
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
17
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
18
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
19
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
20
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी

बुलडाणा : हतेडी येथे आग लागून चार घरांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:31 AM

बुलडाणा : नजीकच्या हतेडी बु. येथील चार ते पाच घरांना अचानक आग लागली, तर एक भुशाचे कोठार खाक झाल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान घडली. या  आगीत ५६ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती तलाठी उषा इंगळे यांनी दिली. 

ठळक मुद्दे२४ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली घटनाआगीत ५६ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : नजीकच्या हतेडी बु. येथील चार ते पाच घरांना अचानक आग लागली, तर एक भुशाचे कोठार खाक झाल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान घडली. या  आगीत ५६ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती तलाठी उषा इंगळे यांनी दिली.  प्राप्त माहितीनुसार, जि. प. शाळेला लागून असलेल्या वस्तीत कुणीतरी शेकोटी पेटविली होती. वार्‍यामुळे अर्धवट विझविलेल्या शेकोटीतील विस्तव उडाल्याने कलाबाई पवार, प्रभाकर जाधव, भानुदास निकाळजे, नीलेश जाधव यांच्या घरासमोरील ओसर्‍यांना आग लागली. घरातील कपडे, इलेक्ट्रिक मीटर, लाकडी सामान, टिनपत्रे जळाले. आगीची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेत पाण्याच्या साहाय्याने आग विझविण्यास सुरुवात केली. त्यामुळे लवकर आगीवर नियंत्रण मिळविता आले; मात्र रमेश जाधव यांचे भुशाचे कोठार पूर्णपणे जळून खाक झाले. तलाठी उषा इंगळे, ग्रामसेवक एन. बी. जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यावेळी सरपंच सुनंदा झिने, सामाजिक कार्यकर्ते गणेश सोनुने, बिट जमादार कोर्डे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfireआग