बुलडाणा : खर्चाच्या हिशेबासाठी ग्राम पंचायत सदस्यांचे उपोषण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:20 IST2018-03-31T00:20:57+5:302018-03-31T00:20:57+5:30

शिवणी अरमाळ (ता. देऊळगाव राजा): ग्रामपंचायत निधीच्या खर्चाचा हिशेब देण्यात यावा, या मागणीसाठी देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे.

Buldana: Gram Panchayat members fasting for the expenditure! | बुलडाणा : खर्चाच्या हिशेबासाठी ग्राम पंचायत सदस्यांचे उपोषण!

बुलडाणा : खर्चाच्या हिशेबासाठी ग्राम पंचायत सदस्यांचे उपोषण!

ठळक मुद्देदेऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील ग्रामपंचायत पाच सदस्य चढले पाण्याच्या टाकीवर

बुलडाणा न्यूज नेटवर्क
शिवणी अरमाळ (ता. देऊळगाव राजा): ग्रामपंचायत निधीच्या खर्चाचा हिशेब देण्यात यावा, या मागणीसाठी देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे.
मुक्ताबाई भगवान आरमाल, शकुंतला दिलीप सोनपसारे, यशोदा किसन राठोड, दीपक सोनपसारे, नामदेव कुंडलीक कायंदे यांच्यासह अन्य व्यक्तींनी हे उपोषण सुरू केले आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या खर्चाचा हिशेब या सदस्यांना हवा आहे. यावेळी  संतोष अरमाळ, अर्जून नागरे, बद्री कायंदे, सुभाष घेवदे, सुभाष गुंजाळ, पंढरी जाधव, योगेश आरमाळ, विष्णू गायकी, रमेश ढाकणे, गणेश ढाकणे, अण्णा शिंदे, भानदास नागरे, अशोक गायकवाड, शिवलाल मोहने व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Buldana: Gram Panchayat members fasting for the expenditure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.