शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बुलडाणा : खामगावात ‘कबड्डी’चा वाद शिगेला, वाहनांच्या जाळपोळीसहीत दगडफेक   

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 10:43 AM

खामगावात कबड्डी सामन्याच्या वादातून निर्माण झालेला पेच अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे.

खामगाव : खामगावात कबड्डी सामन्याच्या वादातून निर्माण झालेला पेच अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी ( 23 फेब्रुवारी ) उशीरा रात्री शहरातील शिवाजी नगर आणि सतीफैल भागात दोन वाहने पेटवण्यात आली. ही घटना शुक्रवारच्या मध्यरात्री घडली.शहरातील  शिवाजी पुतळ्याजवळ आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेतील अंतिम सामन्याच्यावेळी प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळाडूच्या प्रोत्साहनावरून वाद झाला होता. या  वादाचे पर्यावसन दगडफेकीत झाले. यात चार जण जखमी झाले होते. तर  १०-१२  वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.  

बुधवारी ( 21 फेब्रुवारी ) सायंकाळपासून या भागात सतीफैल विरुद्ध शिवाजी फैल असा सामना रंगत असून, गुरूवारी (22 फेब्रुवारी) रात्री ९.३० वाजता दोन्ही फैल समोरा-समोर झाले. कबड्डीच्या वादाची धुसफूस कायम असल्याने, या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यु.के. जाधव यांची बदली झाली.

त्यानंतर नवीन ठाणेदार संतोष ताले पदभार घेण्यापूर्वीच या भागात कबड्डीच्या वादातून दोन वाहने जाळण्यात आली. यामध्ये ऑटोचा व एका नव्या को-या डस्टर कारचा समावेश आहे.  जाळण्यात आलेला ऑटो रेखा प्लॉट भागातील शिनगारे यांचा असून, कार ही तानाजी व्यायाम शाळेचे अध्यक्ष तोडकर यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एकाच समुदायातील दोन गट लहान-सहान गोष्टीवरून कुरापती उकरून काढत असल्याची चर्चा परिसरात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा