बुलडाणा जिल्हा शल्य चिकित्सकावर गुन्हा

By Admin | Updated: July 7, 2016 02:44 IST2016-07-07T02:44:03+5:302016-07-07T02:44:03+5:30

शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षाला शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

Buldana District Surgeon Crime | बुलडाणा जिल्हा शल्य चिकित्सकावर गुन्हा

बुलडाणा जिल्हा शल्य चिकित्सकावर गुन्हा

देऊळगावराजा (जि. बुलडाणा) : येथील शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्षांना मोबाइलवर शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास सोनटक्के यांच्यावर देऊळगाव राजा पोलिसांनी ५ जुलै रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी दे.राजा पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे, की स्थानिक ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्याने येथील ग्रामीण रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. ही बाबत शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास सोनटक्के यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविली. संभाषणादरम्यान सोनटक्के यांनी उद्धटपणे बोलून इंगळे यांना अश्लील शिवीगाळ केली. हे संभाषण राजेश इंगळे यांनी मोबाइलमध्ये रेकॉर्ड करुन याबाबत पोलिसात तक्रार नोंद केली. सदर तक्रार व मोबाइल रेकॉर्डच्या आधारे देऊळगाव राजा पोलिसात जिल्हा शल्य चिकित्सक सोनटक्के यांच्या विरुद्ध ४ जुलै रोजी रात्री उशिरा भादंवि ५0६ कलमान्वये अदाखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Buldana District Surgeon Crime