शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हयात तीन दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 11:33 IST

Buldana district has oxygen stock for three days: ऑक्सिजन उपलब्धतेचे रोटेशन कायम ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सध्या युद्धपातळीवर प्रयत्नरत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील सर्वच गंभीर रुग्णांवर उपचार करण्यात येत असलेल्या बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयांमध्ये तीन दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा सध्या उपलब्ध आहे. त्यानुषंगाने ऑक्सिजन उपलब्धतेचे रोटेशन कायम ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सध्या युद्धपातळीवर प्रयत्नरत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.जिल्ह्यातील खासगी व शासकीय अशा जवळपास ५४ ठिकाणी कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येतात. दरम्यान, यातील गंभीर रुग्णांना जिल्हा मुख्यालयी असलेल्या कोविड समर्पित रुग्णालयात प्रामुख्याने उपचारासाठी हलविण्यात येते. त्यामुळे येथे बेडची कायम कमतरता भासत असल्याचे चित्र आहे. गंभीर रुग्ण हे प्रामुख्याने बुलडाण्यातील कोविड समर्पित रुग्णालयांत उपचारासाठी आणले जातात. त्यामुळे येथे प्रतिदिन ८ ते ९ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत असते. जिल्ह्यातील अन्य ठिकाणांपेक्षा बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयांत त्यामुळे ऑक्सिजनची अधिक गरज भासत असते. त्यामुळे येथील अैाषधसाठा, ऑक्सिजनची स्थिती यासह तत्सम बाबीवर आरोग्य विभागाचे बारकाईने लक्ष असते. परिणामी ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात जालना येथील पुरवठादाराशी नियमित स्वरुपात आरोग्य विभागाचा संपर्क राहतो. सध्या रुग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे ऑक्सिजनचीही मागणी वाढली आहे. कोविड समर्पित रुग्णालयांत २० केएलचा ऑक्सिजन प्लॅन्ट असून, त्यावरच येथील सध्याची मदार आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाhospitalहॉस्पिटल