शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ५१ हजार लोकसंख्या 'हाय-रिस्क झोन'मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 18:11 IST

जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत १.८३ टक्के लोकसंख्या कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळलेल्या हायरिस्क झोनमध्ये राहत आहे.

- नीलेश जोशीबुलडाणा: पश्चिम वºहाडात बुलडाणा जिल्हा कोरोना संसर्गाचे इपीक सेंटर ठरत असतानाच जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत १.८३ टक्के लोकसंख्या कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळलेल्या हायरिस्क झोनमध्ये राहत आहे. त्यामुळे जिल्ह्याची एकंदरीत गंभीर स्थिती पाहता क्लस्टर कंटेनमेंट प्लॅन गंभीरतेने अंमलबजावणी करून कम्युनीटी स्प्रेडचा (समूह संक्रमण) धोका टाळण्यासाठी संपूर्ण यंत्रणेची ताकद झोकून देणार आहोत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.दरम्यान, बुलडाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची वाढती लोकसंख्या पाहता आता बुलडाण्यातच आता रॅपीड टेस्टची सुविध अल्पावधीतच उपलब्ध होणार आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून त्याबाबत सकारात्मक निर्णय समोर आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, बुलडाणा, खामगाव आणि शेगाव या सहा तालुक्यात कोरोना बाधीत दहा रुग्ण आढळले असून बुलडाण्यातील एकाचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे या तालुक्यातील संबंधीत रुग्णांच्या घराला केंद्र बिंदून मानून तयार करण्यात आलेल्या हायरिस्क झोनमध्ये तब्बल ५१ हजार २५३ लोकसंख्या राहते. या संपूर्ण लोकसंख्येची आरोग्य तपासणी करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या असून यंत्रणांनी त्यास प्रारंभ केला आहे. सोबतच बुलडाणा जिल्ह्यात लॉकडाऊन अर्थात संचारबंदीचीही १०० टक्के अंमलबजावणी होईल याबाबत निर्देश दिले आहेत. जास्तीत जास्त  नागरिकांची आरोग्य तपासणी होईल, या दृष्टीने आपण गंभीरतेने प्रयत्न करत असून यंत्रणेला तशा सुचनाही दिल्या असल्याचे ते म्हणाले.

१२ व्हेंटीलेटर मिळणारजिल्हा मुख्यालयाच्या सामान्य रुग्णालयात अवघे एकच व्हेंटीलेटर आहे. ही गंभीर बाब आपण मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे लवकरच बुलडाणा मुख्यालयाच्या ठिकाणी १० ते १२ व्हेंटीलेटर उपलब्ध करण्यात येतील. सोबतच जिल्ह्यात समुह संक्रमणाचा निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी वॉर्ड निहाय नियोजन करण्यात आले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना यंत्रणेला दिल्या आहेत, असेही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणे